पुण्यातून सुरू होणार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner of India Rajeev Kumar) आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे (Election Commissioner Anupachandra Pandey) यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ ९ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Chief Electoral Officer Shrikant Deshpande) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. (Special brief revision program of voter list to be started from Pune)
- मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी बालेवाडी येथे सकाळी ६.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. (Special brief revision program of voter list to be started from Pune)

