जिल्हा कबड्डी निवड चाचणीत बालेवाडी, चिखली संघांचा दणदणीत विजय

रविवारी उपांत्य व अंतिम सामने

 

पुणे : बाणेर येथील कै. सोपानराव कटके मनपा विद्यालयात सुरू असलेल्या ५३व्या कुमार व कुमारी गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत कुमारी गटातील साखळी सामन्यांत प्रकाश तात्या बालवडकर फाउंडेशन, बालेवाडी आणि ब्रह्मा विष्णू महेश संघ, चिखली यांनी दमदार विजय मिळवला.पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि सतेज संस्था, बाणेर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (pune district kabaddi selection trial baner 2026)

 

 

Mhada Pune Lottery। म्हाडाची ४,४६२ घरांची सोडत कधी? लाखभर अर्ज दाखल; वाचा संपूर्ण वेळापत्रक

 

कुमारी गटातील सामन्यात प्रकाश तात्या बालवडकर फाउंडेशन, बालेवाडीने रणरागिणी संघ, बारामतीचा ५४-१२ असा पराभव केला. बालेवाडीच्या संघाने तब्बल ४२ गुणांच्या फरकाने हा सामना जिंकला.दुसऱ्या सामन्यात ब्रह्मा विष्णू महेश संघ, चिखलीने अभिनव कबड्डी संघ, घोडेगाववर ५१-२५ अशी मात केली. चिखलीच्या संघाने हा सामना २६ गुणांनी जिंकला.

रविवारी उपांत्य आणि अंतिम सामने

स्पर्धेतील कुमार आणि कुमारी गटांच्या उपांत्य फेरी तसेच अंतिम फेरीचे सामने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता सुरू होणार आहेत. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी सात वाजता होणार आहे. विधान परिषदेचे उपसभापती आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार असून पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि स्पर्धेचे आयोजक बाबुराव चांदेरे यांनी ही माहिती दिली.

 

 

 

Local ad 1