साक्ष फाउंडेशन तर्फे वक्तृत्व स्पर्धा व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप

हातकणंगले : सेवाभावी सामाजिक संस्था ह्या समाजाच्या प्रश्नावर काम करून ते सोडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात म्हणून सामाजिक संस्था ह्या समाजाचा आधार असल्याचे मत निवृत्त आर्मी ऑफीसर सर्जेराव मोहिते यांनी व्यक्त केले. (Social organizations are the real basis of society – Sarjerao Mohite)

 

 

यावेळी सरपंच विमल शिंदे, सदस्य संतोष पात्रे, आरपीआय तालुका अध्यक्ष अवंतिका सावंत, मिनाक्षी स्वामी, समाजसेवक अनिल शिंदे, पंचशील तरूण मंडळ अध्यक्ष प्रविण आठवले, सचिन खांडेकर, चंदन मचले, आश्विनी भोसले, वैष्णवी मचले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

महात्मा गांधी जयंती निमित्त साक्ष फाउंडेशन तर्फे विद्यामंदिर नागांव कोल्हापूर या ठिकाणी शालेय वस्तू वाटप आणि वक्तृत्वस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला, साक्ष फाउंडेशच्या (Saksha Foundation) संस्थापक सेक्रेटरी स्वरांजली आठवले यांनी विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि पुरस्कार साहित्याचे वाटप केले. संस्था करत असलेल्या या समाजसेवा कार्याचे पाहुणे आणि अध्यक्षानी कौतुक केले, समाज सेवा करणं ही आवड उपजत असावी लागते आणि समाजाचे काही देणं लागतो ही भावना जागृत असावी तेव्हाच हातून समाज हिताचं कार्य घडत असते ते काम साक्ष फाउंडेशन कडून होत असल्याचे गौरवोद्गार काढले.

 

 

भविष्यात फाउंडेशनसाठी सर्वोतोपरी योगदान देणार असल्याचे अश्वासन मोहिते त्यांनी दिले. विद्यालयाचे मुख्याधापक यांनी फाउंडेशनच्या सेक्रेटरी स्वरांजली आठवले यांचा सत्कार करून कार्याचे कौतुक केले, सूत्र संचालन पाटील सर, प्रास्ताविक कुभार सर यांनी केले तर स्वरांजली आठवले यांनी पाहुण्यांचे आभार मानले
Local ad 1