पुण्यात ‘कॉकरोच प्रोटेस्ट’ची हाक; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, ११ जूनला विद्यापीठात आंदोलन

Cockroach Protest Pune पुणे : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ११ जून रोजी पुण्यात अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजकांनी या आंदोलनाला प्रतीकात्मक स्वरूप देत “झुरळ आंदोलन” (Cockroach Protest Pune) करण्याचे आवाहन केले आहे. हे आंदोलन सायंकाळी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न आणि धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

 

पुण्यातील आयव्हीएफ, सोनोग्राफी केंद्रांची चौकशी करा : रोहन सुरवसे – पाटील

सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या आवाहनात “महाराष्ट्राच्या शैक्षणिक राजधानी पुण्यात झुरळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतील” असा उल्लेख करण्यात आला आहे. या अनोख्या आंदोलनामुळे विद्यार्थी, युवक आणि सामाजिक वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाकडे राज्यातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

https://x.com/i/status/2063965579405324760

Local ad 1