...

Pune Municipal Election 2025 : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

 

Pune Municipal Election 2025 पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आज (ता. ३० डिसेंबर) संपत असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अद्याप जागावाटपावर एकमत न झाल्याने शेवटच्या दिवशी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. (pune municipal election last day nomination crowd)

 

Pune Municipal Election 2025 : एका दिवसात 645 उमेदवारी अर्ज, कोणत्या प्रभात किती अर्ज दाखल झाले ?

 

महायुतीत अद्याप जागावाटपाचे सूत्र निश्चित झालेले नाही. भाजपकडून अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नसली, तरी संभाव्य उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेतही उमेदवारीबाबत संभ्रम कायम असून, त्यामुळे त्यांची यादी रखडली आहे.

 

महाविकास आघाडीत ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांचा समावेश आहे. जागावाटपाचे सूत्र ठरले असले, तरी उमेदवारांची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची आघाडी निश्चित झाल्याचे रविवारी रात्री कार्यकर्त्यांना कळविण्यात आले. मात्र, सोमवारी दुपारपर्यंत दोन्ही राष्ट्रवादींकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची नावे जाणीवपूर्वक गुप्त ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संभाव्य उमेदवारांना थेट क्षेत्रीय कार्यालयात ‘एबी’ फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक नेत्यांकडून देण्यात आली आहे.

 

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली असून, आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ४१ प्रभागांमधील १६५ सदस्य पदांसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आज, सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी एकाच दिवसात तब्बल ६४५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तसेच २३ ते २७ डिसेंबर दरम्यान, ४९ अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांची एकूण संख्या ७४३ वर पोहोचली आहे.   या पार्श्वभूमीवर, आज शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी आणि झुंबड उडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

 

 

❓ प्रश्न – उत्तर 

प्रश्न 1 : पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख कोणती?
उत्तर : उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर असून, दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

प्रश्न 2 : आतापर्यंत किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत?
उत्तर : ४१ प्रभागांमध्ये आतापर्यंत केवळ ४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

प्रश्न 3 : राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निश्चित झाली आहे का?
उत्तर : होय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची आघाडी निश्चित झाली आहे.

प्रश्न 4 : उमेदवारांच्या याद्या उशिरा का जाहीर होत आहेत?
उत्तर : बंडखोरी टाळण्यासाठी अनेक पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाणीवपूर्वक उशिरा जाहीर केल्याची चर्चा आहे.

 

 

Local ad 1