Pune Municipal Election 2025 : एका दिवसात 645 उमेदवारी अर्ज, कोणत्या प्रभात किती अर्ज दाखल झाले ?
Pune Municipal Election 2025 पुणे: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. ४१ प्रभागांमधील १६५ सदस्य पदांसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आज, सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी एकाच दिवसात तब्बल ६४५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तसेच २३ ते २७ डिसेंबर दरम्यान, ४९ अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांची एकूण संख्या ७४३ वर पोहोचली आहे.
https://www.facebook.com/MHTIMES2021
पुण्यात शेवटी काँग्रेस-शिवसेनेच ठरलं ! कोणाला किती जागा मिळाल्या ?
निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत एकूण १०,३०७ नामनिर्देशन फॉर्मची विक्री झाली होती. आज दि. २९ डिसेंबर रोजी पुन्हा १४४९ फॉर्मची विक्री झाली आहे. यामध्ये भवानी पेठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सर्वाधिक फॉर्मची विक्री झाली असून, येरवडा-कळस-धानोरी कार्यालयातून सर्वात कमी विक्रीची नोंद झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय | दाखल अर्ज
नगर रोड – वडगाव शेरी – ८८
बिबवेवाडी – ७२
येरवडा – कळस – धानोरी – ६९
हडपसर – मुंढवा – ६३
भवानी पेठ – ५९
धनकवडी – सहकारनगर – ५८
वारजे – कर्वेनगर – ४८
ढोले पाटील रोड – ४७
वानवडी – रामटेकडी – ४२
सिंहगड रोड – ४०
कसबा – विश्रामबाग वाडा – ३२
कोथरूड – बावधन – २४
औंध – बाणेर – २०
कोंढवा – येवलेवाडी – १८
शिवाजीनगर – घोले रोड – १४
एकूण – ६९४
आचारसंहितेची कडक अंमलबजावणी
निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध आदर्श आचारसंहिता पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. निवडणूक कार्यालयामार्फत आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून उमेदवारांचा प्रतिसाद मोठा आहे. आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.”
— प्रसाद कोटकर, उप आयुक्त, निवडणूक कार्यालय, पुणे महानगरपालिका.
❓ प्रश्न – उत्तर (FAQ)
प्रश्न 1 : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत किती उमेदवारी अर्ज दाखल झाले?
उत्तर : आतापर्यंत एकूण 694 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
प्रश्न 2 : एका दिवसात सर्वाधिक किती अर्ज दाखल झाले?
उत्तर : दि. 29 डिसेंबर 2025 रोजी 645 अर्ज दाखल झाले.
प्रश्न 3 : पुणे महापालिकेत किती प्रभाग आणि नगरसेवक असतील?
उत्तर : 41 प्रभागांतून 165 नगरसेवकांची निवड होणार आहे.
प्रश्न 4 : नामनिर्देशन फॉर्मची सर्वाधिक विक्री कुठे झाली?
उत्तर : भवानी पेठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सर्वाधिक विक्री झाली.
प्रश्न 5 : निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे का?
उत्तर : होय, पुणे महानगरपालिका हद्दीत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

