...

PMC Election 2025 : नामनिर्देशन छाननीत 174 अर्ज ठरले अवैध

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ चा कार्यक्रम जाहीर झाला असून, शहरातील ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवकांची निवड होणार आहे. यासाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी (Returning Officer) यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. दि. २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत या १५ कार्यालयांकडून एकूण १२,१९७ नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली. त्यापैकी ३०५२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली. छाननीअंती विविध प्रभागांतील वैध व अवैध नामनिर्देशनांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. (pune municipal corporation election 2025 nomination scrutiny)

 

पुणे महापालिका निवडणूक : भाजपकडून महिलांना मोठी संधी, 165 पैकी 91 महिला उमेदवार

 

 

येरवडा–कळस–धानोरी कार्यालयाकडे प्राप्त २४८ नामनिर्देशनांपैकी २४६ वैध तर २ अवैध ठरविण्यात आली. नगर रोड–वडगाव शेरी कार्यालयाकडे प्राप्त २४३ नामनिर्देशनांपैकी १९० वैध तर ५३ अवैध ठरली. कोथरूड–बावधन कार्यालयाकडे १७४ पैकी १५८ वैध व १६ अवैध, औंध–बाणेर कार्यालयाकडे ११३ पैकी १०१ वैध व १२ अवैध नामनिर्देशन ठरली. शिवाजीनगर–घोले रोड कार्यालयाकडे १५९ पैकी १५६ वैध, कै. बा. स. ढोले पाटील रोड कार्यालयाकडे १२२ पैकी ११४ वैध, हडपसर–मुंढवा कार्यालयाकडे ३४९ पैकी ३१७ वैध तर ३२ अवैध नामनिर्देशन ठरविण्यात आली.

 

Nanded Municipal Election : भाजपकडून पती-पत्नी, पिता-पुत्रांना उमेदवारी; घराणेशाहीवर आरोप

 

 

वानवडी–रामटेकडी कार्यालयाकडे २६३ पैकी २६१ वैध, बिबवेवाडी कार्यालयाकडे २३८ पैकी २३१ वैध, भवानी पेठ कार्यालयाकडे २९४ पैकी २८० वैध नामनिर्देशन ठरली. वारजे–कर्वेनगर कार्यालयाकडे प्राप्त सर्व १७१ नामनिर्देशन वैध ठरली. सिंहगड रोड कार्यालयाकडे १६७ पैकी १६२ वैध, धनकवडी–सहकारनगर कार्यालयाकडे २४२ पैकी २३१ वैध, कोंढवा–येवलेवाडी कार्यालयाकडे ९४ पैकी ८५ वैध नामनिर्देशन ठरविण्यात आली. कसबा–विश्रामबाग वाडा कार्यालयाकडील छाननी अद्याप सुरू असून, त्यांची माहिती वगळता उर्वरित १४ कार्यालयांतून प्राप्त २८७७ नामनिर्देशनांपैकी २७०३ नामनिर्देशन वैध, तर १७४ नामनिर्देशन अवैध ठरविण्यात आली आहेत.

 

Pune Municipal Election : भाजपसमोर राजकीय कसोटी, दोन्ही राष्ट्रवादींची एकजूट निर्णायक?

 

 

नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या अंतिम दिवशी तब्बल २४३६ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती. काही कार्यालयांमध्ये उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर हरकती घेतल्याने छाननी प्रक्रियेस अधिक कालावधी लागल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ही माहिती उप आयुक्त, निवडणूक कार्यालय, पुणे महानगरपालिका यांनी दिली.

 

 

❓ प्रश्न–उत्तर (FAQ Schema साठी)

 

 

प्रश्न 1 : पुणे महापालिका निवडणूक 2025-26 मध्ये किती प्रभाग आहेत?
उत्तर : पुणे महापालिकेत एकूण 41 प्रभाग असून 165 नगरसेवक निवडले जाणार आहेत.

प्रश्न 2 : एकूण किती नामनिर्देशन पत्रे दाखल झाली?
उत्तर : एकूण 3052 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती.

प्रश्न 3 : छाननीनंतर किती नामनिर्देशन वैध ठरली?
उत्तर : कसबा–विश्रामबाग वाडा कार्यालय वगळता 2703 नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत.

प्रश्न 4 : किती नामनिर्देशन पत्रे अवैध ठरविण्यात आली?
उत्तर : आतापर्यंत 174 नामनिर्देशन पत्रे अवैध ठरविण्यात आली आहेत.

प्रश्न 5 : नामनिर्देशन छाननीस विलंब का झाला?
उत्तर : अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन दाखल झाल्याने व उमेदवारांनी हरकती घेतल्यामुळे छाननीस अधिक वेळ लागला.

 

Local ad 1