...

पुणे प्रभाग २४ मध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश | Kasba Area Politics

 

पुणे | प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल) येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. (pune ward 24 mns leaders join bjp)

 

PMC Election 2025 : नामनिर्देशन छाननीत 174 अर्ज ठरले अवैध

 

मनसेचे उपविभाग अध्यक्ष रवी उर्फ बंडू भोसले, शाखा अध्यक्ष प्रशांत गायकवाड, तसेच प्रीतम गायकवाड, योगेश पाष्टे, अजय चव्हाण, संतोष टिळेकर आदी कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विकासात्मक विचारसरणीवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला.

 

पुणे महापालिका निवडणूक : भाजपकडून महिलांना मोठी संधी, 165 पैकी 91 महिला उमेदवार

 

या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठे बळ मिळाले आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी, विकासकामे व स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Local ad 1