...

व्हिडीओ : छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील कचरा प्रश्न गंभीर; कॅन्टोन्मेंट बोर्डवर व्यापाऱ्यांचा आरोप

पुणे | प्रतिनिधी
पुणे कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात चिकन, मासे आणि इतर सडणारा कचरा तयार होतो. या कचऱ्याची नियमित उचल करण्याची जबाबदारी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची असताना, कचरा गाडी वेळेवर न आल्यामुळे व्यापाऱ्यांना कचरा मार्केटबाहेर ठेवावा लागत आहे. परिणामी, मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (pune camp chhatrapati shivaji market garbage issue cantonment board)

 

भाजपची १०० उमेदवारांची यादी तयार; बंडखोरी टाळण्यासाठी ‘वेट अँड वॉच’ धोरण

 

 

कचरा वेळेवर न उचलल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांचा संताप व्यापाऱ्यांवर व्यक्त होत असून, प्रत्यक्षात कचरा उचलण्याची जबाबदारी कॅन्टोन्मेंट बोर्डाची असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, बोर्डाकडून या विषयाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप छत्रपती शिवाजी महाराज मार्केट असोशिएशनचे शंकर सर्वे आणि फुरखान मंजुर शेख यांनी केला आहे.

 

 

 

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घंटागाडी दररोज येणे अपेक्षित असते; मात्र आठवड्यातून दोन ते तीन दिवस येत नाही. कधी गाडी पंचर आहे, कधी रॅम अडकली आहे, तर कधी इंजिन बिघाडाचे कारण दिले जाते. दुसरीकडे, कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला नियमित पेमेंट दिले जात असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, कचरा गाडीवाले मार्केटबाहेरील दुकानदारांचा कचरा आधी घेतात, तर मार्केटमधील सडणारा कचरा नंतर घेण्याचे सांगून टाळाटाळ केली जाते, असा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे.

 

प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; पुण्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली

 

 

छत्रपती शिवाजी महाराज मार्केटसमोर शाळा, चर्च आणि इतर सार्वजनिक ठिकाणे असून, येथे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे कचऱ्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता आणि दुर्गंधी हा गंभीर सार्वजनिक प्रश्न बनला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन दररोज कचरा उचलण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

❓ प्रश्न–उत्तर (FAQ)

प्रश्न 1 : छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधील कचरा कोण उचलतो?
➡️ या मार्केटमधील कचरा उचलण्याची जबाबदारी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची आहे.

प्रश्न 2 : कचरा वेळेवर का उचलला जात नाही?
➡️ कचरा गाडी पंचर, इंजिन बिघाड, रॅम अडकणे अशी कारणे देऊन अनेकदा गाडी येत नाही, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे.

प्रश्न 3 : याचा नागरिकांवर काय परिणाम होत आहे?
➡️ दुर्गंधी, अस्वच्छता, आरोग्याचा धोका आणि मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

प्रश्न 4 : व्यापाऱ्यांची मुख्य मागणी काय आहे?
➡️ दररोज नियमित कचरा उचलावा आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने ठोस सूचना द्याव्यात.

प्रश्न 5 : कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून ठेकेदाराला पेमेंट मिळते का?
➡️ व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, ठेकेदाराला बोर्डाकडून नियमित पेमेंट दिले जाते.

 

Local ad 1