इतिहास माहित नसणार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलू नये ; खासदार श्रीकांत शिंदे यांचा आमदार लाड यांना टोला

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान भाजपचे आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी केले. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून त्याचा निषेध केला जात आहे. त्यावर आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे (Balasaheb’s Shiv Sena MP Dr.Shrikant Shinde) यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. ज्यांना इतिहास माहित नाही, अशांनी त्यावर बोलू नये, अशा शब्दांत डाॅ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी आमदार प्रसाद लाड यांना टोला लगावला आहे.

 

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने रविवारी पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शिंदे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (People who do not know history should not talk about Chhatrapati Shivaji Maharaj; MP Dr.Shrikant Shinde)

 

कोणत्याही पक्षाचा असो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत जर चुकीचे वक्तव्य करत असेल तर राज्याची जनतेला, तसेच कोणालाही ते मान्य होणार नाही. प्रत्येकाने तारतम्य बाळगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल बोलावे. कोणीही उठत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत विधान करतो, हे चुकीचे आहे. तो आमच्या पक्षातील असो की, अन्य कुठल्याही दुसर्‍या पक्षाचा असो महाराजांबद्दल बोलताना हजार वेळा विचार करूनच बोलावे, असे खासदार शिंदे म्हणाले. (People who do not know history should not talk about Chhatrapati Shivaji Maharaj; MP Dr.Shrikant Shinde)

 

 

खासदार शिंदे म्हणाले, ‘राज्यात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. माीगल अडीच वर्षात जे निर्णय अडकून होते, ते निर्णय केवळ पाच महिन्या शिंदे-फडणवीस सरकारने घेतले?आहेत. (People who do not know history should not talk about Chhatrapati Shivaji Maharaj; MP Dr.Shrikant Shinde)

Local ad 1