पुणे, नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपला राष्ट्रीय मराठा पार्टीचा पाठिंबा

 

पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय मराठा पार्टीने पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मुंबई येथे ही घोषणा केली.

 

 

MH Times Special Story। गुलाबाच्या फुलांपासून चक्क वाइन ! मायलेकींचा १२ वर्षांचा संघर्ष, अखेर स्वप्न साकार

 

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही मतदारसंघांतील भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रीय मराठा पार्टीने घेतला आहे. यानुसार पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पक्षाचा पाठिंबा मिळणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवारालाही पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.

 

 

या निर्णयाला राष्ट्रीय आणि प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिले आहे. त्यामध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्ष किशोर गाढे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब आहेर, परमेश्वर देशमुख, डॉ. प्रेमानंद वाघमारे, सुरेंद्र कर्डिले, राष्ट्रीय सचिव अनिकेत जाधव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुदेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा कल्पना बेंढाले, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र भांगे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष धोंडीराम शिंदे, विभागीय संपर्कप्रमुख मनोज बाऊस्कर आणि विदर्भ विभागीय अध्यक्ष उमेश घाडगे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 

राष्ट्रीय मराठा पार्टीच्या या निर्णयामुळे तिन्ही मतदारसंघांतील भाजप उमेदवारांना संघटनात्मक पाठबळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Local ad 1