Prashant Jagtap Congress Entry। पुणे | प्रतिनिधी दि. २६ डिसेंबर : पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत जगताप कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना अखेर गुरुवारी पूर्णविराम मिळाला. प्रशांत जगताप यांनी मुंबईतील टिळक भवन येथे दुपारी १२ वाजता काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. त्यामुळे पुणे शहरातील काँग्रेसची राजकीय ताकद वाढल्याचे चित्र आहे. (Prashant Jagtap Congress Entry Pune Politics)
बुधवारी दिवसभर प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, रात्री उशिरा शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जगताप यांचे फोनवरून बोलणे झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ते ठाकरे गटात जाणार, अशीही जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र, अखेर जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत या सर्व चर्चांना विराम दिला.
Central Railway Winter Special : नागपूर-पुणे-हडपसर मार्गावर ख्रिसमस-नववर्षासाठी विशेष गाड्या
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असताना प्रशांत जगताप हे शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले होते. मात्र, सध्या शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी गटांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका एकत्र लढवण्यावर चर्चा सुरु आहे. पुणे महापालिकेत अजित पवार यांच्या गटासोबत न जाण्याची ठाम भूमिका जगताप यांनी मांडली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी आघाडी करुनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाराजी व्यक्त करत प्रशांत जगताप यांनी पुणे शहराध्यक्ष तसेच सक्रिय सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले होते.
महानगरपालिका निवडणुका : राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक मैदानात ; कोणाची लागली वर्णी ?
ज्या विचारधारेसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस सोडली, ती विचारधारा काँग्रेसशी अधिक जवळची असल्याचे मत जगताप समर्थकांकडून व्यक्त केले जात होते. काँग्रेस भाजपविरोधात ठाम भूमिका घेत असल्यामुळे प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. याच पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर गुरुवारी त्यांनी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
उत्तर: राष्ट्रवादीतील संयुक्त निवडणूक निर्णयामुळे नाराजी.Q2. याचा पुणे महापालिका निवडणुकीवर काय परिणाम?
उत्तर: काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढणार.

