कसब्यातील विजयानंतर काँग्रेसमध्ये इनकमिंग ; एमआयएम शहर कोर कमेटी सदस्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे  : कसबा पेठेत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर पुणे आणि खडकी कँन्टोमेंन्ट बोर्डाच्या निवडणुका (Pune and Khadki Cantonment Board Election) ताकदीने लढविण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यानुसार पुणे कँन्टोमेंन्टमध्ये (Pune Cantonment) इच्छुकांना तयारीला लागा, असे सांगण्यात आले. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू झाली आहे. (After the victory in Kasaba, the incoming in Congress started)

एमआयएम कॅन्टोमेंन्ट विधानसभा मतदार संघाचा माजी अध्यक्ष तथा पुणे शहर एमआयएम  पुणे शहर कोर कमेटीचे सदस्य अबू सुफियान कुरेशी (Abu Sufyan Qureshi) यांने आपल्या समर्थकासह गुरुवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. (After the victory in Kasaba, the incoming in Congress started)

 

अबू सुफियान कुरेशी यांचा सत्कार करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. यावेळी इतर मान्यवर
कसबा पेठेत काँग्रेस पक्षाला मिळालेले यशानंतर कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे सुरू असलेल्या निवडणुकीची जोरदार तयारी केली जात असून, एमआयएम पक्ष पुणे शहर कोरकमेटी सदस्य अबू सुफियान कुरेशी यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी माजी मंत्री नसीम खान, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, पुणे शहर अध्यक्ष आरंविद शिंदे आदी उपस्थित होते.

 

हजी बिलाल कुरेशी, मजहर चौधरी, अथर चौधरी, सोहील कुरेशी, नाविद चौधरी, असद पटेल, अब्दुल हमीद कुरेशी, गुलाम कुरेशी यावेळी उपस्थित होते.

 

 

कोण आहेत अबू सुफियान कुरेशी

कॅन्टोमेंट बोर्डातील वार्ड क्रमांक तीन मधून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पुणे शहरात एमआयएम पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत. तसेच ऑल इंडिया जमियातूल कुरेश महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष म्हणून राज्यभर काम करत आहेत.

Local ad 1