...

रेती–मुरुम माफियांना दणका ! विना नंबर ११ हायवा पकडल्या

 

नांदेड : जिल्ह्यात बेकायदेशीर विना नंबर अवजड वाहनांच्या वाहतुकीविरोधात जिल्हा प्रशासनाने कडक पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोमवारी (दि. 30 डिसेंबर) नांदेड शहरात अचानक धडक कारवाई करत लातूर रोडवरील विष्णुपुरी परिसरात अवैध वाहतुकीसाठी उभ्या असलेल्या ११ विना नंबर हायवा पकडल्या. (nanded vinanumber hayva karwai district collector)

 

लक्ष्मी पेट्रोल पंप परिसरात रेती, मुरुम व मातीची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणांना कारवाईचे आदेश दिले. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, शासनाचा महसूल बुडविणे तसेच अपघातांना आमंत्रण देणाऱ्या विना नंबर वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पकडण्यात आलेल्या सर्व हायवा पुढील कारवाईसाठी महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आल्या. आरटीओकडून नियमानुसार या वाहनांवर एकूण ७३ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

 

जिल्ह्यात यापुढेही रेती, मुरुम, माती आदींची वाहतूक विना नंबर, अपूर्ण कागदपत्रे किंवा नियमबाह्य पद्धतीने करणाऱ्या हायवा व इतर अवजड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिला. “वाहन चालक व मालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

 

पकडण्यात आलेल्या हायवा वाहनांचे क्रमांक 

एमएच 46 बीबी 9546,
एमएच 26 सीएच 2721,
एमएच 26 सीटी 7779,
एमएच 26 सीएम 7779,
एमएच 26 सीएच 4909,
एमएच 21 बीएच 0804,
एमएच 26 सीएच 7565,
एमएच 29 बीई 4869,
एमएच 26 सीएच 2909,
एमएच 14 एलएक्स 4892,
एमएच 26 सीएच 2429.

 

 

 

❓ प्रश्नोत्तर (FAQ Schema)

 

प्रश्न 1 : नांदेडमध्ये विना नंबर हायवांवर कारवाई कोणी केली?
उत्तर : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अचानक धडक कारवाई केली.

प्रश्न 2 : एकूण किती विना नंबर हायवा पकडण्यात आल्या?
उत्तर : एकूण ११ विना नंबर हायवा पकडण्यात आल्या.

प्रश्न 3 : या कारवाईत किती दंड आकारण्यात आला?
उत्तर : आरटीओकडून एकूण ७३ हजार ७५० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

प्रश्न 4 : कोणत्या प्रकारची वाहतूक बेकायदेशीर आढळली?
उत्तर : रेती, मुरुम व मातीची विना नंबर व नियमबाह्य वाहतूक आढळली.

प्रश्न 5 : पुढे अशा वाहनांवर काय कारवाई होणार?
उत्तर : विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 

Local ad 1