शेतकऱ्यांचे संकट वाढले ; पावसाअभावी पेरणी रखडली
कोकणात समाधान, मराठवाडा-विदर्भात पाऊस गायब !
पुणे | २७ जून २०२५ – राज्यात यंदा मॉन्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाच्या पावसाच्या व पेरणी प्रगती अहवालानुसार, राज्यात १ जूनपासून २७ जून २०२५ पर्यंत केवळ ५७.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी राज्याच्या सरासरीच्या तुलनेत तब्बल ५२% ने कमी आहे. कोकण विभागात समाधानकारक पाऊस पडला असला तरी, विदर्भ व मराठवाडा विभागांत पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परिणामी, या भागांतील शेतकऱ्यांना पेरणीची प्रतिक्षा करावी लागत आहे. (maharashtra rainfall sowing report june 2025)
भाजपचे माजी मंत्री बाबनराव लोणीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील पेरणीची प्रगती संथ आहे. कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार, राज्यात आजअखेर केवळ ७.६६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. विभागनिहाय आकडेवारी पाहता, विदर्भातील स्थिती अत्यंत चिंताजनक असून सर्वाधिक पेरणी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे.
पेरणीची प्रगती अत्यल्प
राज्यात आतापर्यंत फक्त ७.६६ लाख हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद आणि भात या पिकांचा सर्वाधिक समावेश आहे. सर्वात कमी पेरणी क्षेत्र पूर्व विदर्भात असून, केवळ १.१६ लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे.
Big Breaking News। भीमाशंकर विकास आराखड्याला मंजुरी ; हेलीपॅडसह रस्त्यांचा होणार विकास
कोकण विभागात समाधानकारक पावसामुळे भाताच्या पेरणीत वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने सोयाबीन व उडीद यांची पेरणी सुरू झाली आहे. मराठवाड्यात पावसाचा खंड असूनही काही भागात पेरणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व विदर्भात सर्वात कमी पाऊस (२९% सरासरी) झाल्याने शेतकरी पेरणीसाठी अद्याप वाट पाहत आहेत. पश्चिम विदर्भातही परिस्थिती समाधानकारक नाही.
विभागनिहाय पावसाचे चित्र:
-
कोकण विभाग – १३४.२ मिमी (सरासरीच्या ८५%)
-
पश्चिम महाराष्ट्र – ६८.३ मिमी (४२%)
-
मराठवाडा – ४५.९ मिमी (३३%)
-
पूर्व विदर्भ – ४०.५ मिमी (२९%)
मोठी बातमी : पुणे शहरातील ११ हजार पथविक्रेत्यांना बिल आकारणी होणार
शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन
राज्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करताना पावसाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन आटोपशीर बियाणे, बीजप्रक्रिया, आणि कीड नियंत्रण उपाय यांचा वापर करून योग्य वेळ साधूनच पेरण्या कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पावसाच्या खंडांमुळे शेतकरी संभ्रमात असून, योग्य नियोजन न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाची स्थिती लक्षात घेऊन पेरणी करावी. योग्य वेळ साधून, आटोपशीर व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची निवड करावी.असेही सुचवण्यात आले आहे.
विभागनिहाय पेरणीची आकडेवारी (२७ जून २०२५ पर्यंत)
विभाग | एकूण पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) |
---|---|
कोकण | 1,25,000 हेक्टर |
पश्चिम महाराष्ट्र | 2,17,000 हेक्टर |
मराठवाडा | 2,08,000 हेक्टर |
विदर्भ (पूर्व) | 1,16,000 हेक्टर |
विदर्भ (पश्चिम) | 1,00,000 हेक्टर (अनुमानित) |
एकूण | 7,66,000 हेक्टर |