Central Railway Winter Special : नागपूर-पुणे-हडपसर मार्गावर ख्रिसमस-नववर्षासाठी विशेष गाड्या
पुणे | प्रतिनिधी
ख्रिसमस, नववर्ष आणि विंटर सीझन 2025 दरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता सेंट्रल रेल्वेने वेस्ट सेंट्रल रेल्वेच्या सहकार्याने नागपूर, पुणे, हडपसर आणि राणी कमलापती दरम्यान विशेष भाड्याने (स्पेशल फेअर) विंटर स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (central railway winter special trains nagpur pune hadapsar 2025)
प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार? उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा ?
सेंट्रल रेल्वेकडून एकूण तीन मार्गांवर विशेष सुपरफास्ट आणि साप्ताहिक गाड्या
नागपूर – हडपसर – नागपूर सुपरफास्ट स्पेशल (ट्रेन क्र. 01221 / 01222) – (प्रत्येकी 4 फेऱ्या)
01221 नागपूर – हडपसर स्पेशल ट्रेन 26, 29, 31 डिसेंबर 2025 व 2 जानेवारी 2026 रोजी नागपूरहून रात्री 7.40 वा. प्रस्थान पुढील दिवशी सकाळी 11.25 वा. हडपसर आगमन
01222 हडपसर – नागपूर स्पेशल
28, 30 डिसेंबर 2025 तसेच 1 व 4 जानेवारी 2026 रोजी हडपसरहून दुपारी 3.50 वा. प्रस्थान पुढील दिवशी सकाळी 6.30 वा. नागपूर आगमन
थांबे (दोन्ही बाजूंनी)
अजनी, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर (अहिल्यानगर), दौंड कॉर्ड लाईन, उरुळी
कोच
2 AC फर्स्ट क्लास, 4 AC 2-टियर, 12 AC 3-टियर, 2 गार्ड/लगेज व्हॅन – (एकूण 20 ICF कोच)
महानगरपालिका निवडणुका : राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक मैदानात ; कोणाची लागली वर्णी ?
पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक स्पेशल (ट्रेन क्र. 01419 / 01420)
(प्रत्येकी 4 फेऱ्या)
01419 पुणे – नागपूर स्पेशल 27, 29, 31 डिसेंबर 2025 व 3 जानेवारी 2026
पुण्याहून रात्री 8.30 वा. प्रस्थान करुन पुढील दिवशी दुपारी 2.05 वा. नागपूर आगमन होईल.
01420 नागपूर – पुणे स्पेशल
28, 30 डिसेंबर 2025 तसेच 1 व 4 जानेवारी 2026 नागपूरहून दुपारी 4.10 वा. प्रस्थान करुन पुढील दिवशी सकाळी 11.45 वा. पुणे आगम.
असे असतील थांबे
दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा
कोच : 16 AC 3-टियर, 2 जनरेटर व्हॅन – (एकूण 18 LHB कोच)
राणी कमलापती – हडपसर – राणी कमलापती सुपरफास्ट स्पेशल
ट्रेन क्र. 02156 / 02155 | प्रत्येकी 3 फेऱ्या
02156 राणी कमलापती – हडपसर (शनिवार)
27 डिसेंबर 2025, 3 व 10 जानेवारी 2026 दरम्यान सकाळी 8.40 वा. प्रस्थान
पुढील दिवशी रात्री 12.10 वा. हडपसर आगमन होईल.
02155 हडपसर – राणी कमलापती (रविवार)
28 डिसेंबर 2025, 4 व 11 जानेवारी 2026 दरम्यान सकाळी 7.50 वा. प्रस्थान
त्याच दिवशी रात्री 11.40 वा. आगमन होईल.
असे असतील थांबे : नर्मदापुरम, इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर (अहिल्यानगर), दौंड कॉर्ड लाईन
कोच : 3 AC 2-टियर, 6 AC 3-टियर इकॉनॉमी, 2 स्लीपर, 4 जनरल सेकंड क्लास, 2 जनरेटर/लगेज व्हॅन – एकूण 17 LHB कोच
आरक्षण माहिती
या सर्व विंटर स्पेशल गाड्यांसाठी स्पेशल चार्जवर आरक्षण 26 डिसेंबर 2025 पासून सर्व PRS काउंटर आणि IRCTCच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक व थांबे तपासून घ्यावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

