Nanded-Pune Express Railway | नांदेड ते पुणे आणि पुणे-नांदेड अता दररोज करता येईल रेल्वेने प्रवास
पुणे : मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद (Nanded, Parbhani, Jalna and Aurangabad) जिल्ह्यातून पुणे येथे कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नांदेड -पुणे एक्सप्रेस (Nanded-Pune Express Railway) ही रेल्वे दररोज करा, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार आता नांदेड-पुणे एक्सप्रेस (Nanded-Pune Express Railway) दररोज धावत आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Good news for those traveling by Nanded to Pune and Pune-Nanded railways)
आठवड्यातून दोन वेळा धावणारी नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुणे धावत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली. ही गाडी ५ जुलैपासून दररोज धावत असून, या गाडीच्या नंबरमध्येही बदल करण्यात आली असून, नवीन नंबर १७६३० आणि १७६२९ असा आहे. (Good news for those traveling by Nanded to Pune and Pune-Nanded railways)
मराठवाड्यातून पुण्याला येण्यासाठी ही रेल्वे अत्यंत सोयीची ठरणार आहे. या रेल्वेला १३ डबे असणार आहेत. यात वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे चार डबे, पाच स्लीपर आणि दोन जनरल श्रेणीतील डबे आहेत. (Good news for those traveling by Nanded to Pune and Pune-Nanded railways)
Related Posts
रेल्वेचा मार्ग आणि वेळ
Nanded-Pune Express Railway नांदेड-पुणे एक्स्प्रेस (१७६३०) : ही रेल्वे हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दररोज दुपारी सव्वातीन वाजता सुटत आहे. त्यानंतर पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल. (Good news for those traveling by Nanded to Pune and Pune-Nanded railways)
पुुणे-नांदेड एक्स्प्रेस (१७६२९) : ही रेल्वे पुणे रेल्वे स्थानकावरून रात्री साडेनऊ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वादहा वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचत आहे. (Good news for those traveling by Nanded to Pune and Pune-Nanded railways)