...

रात्री 10.30 वाजता जिल्हाधिकाऱ्यांचा धडक छापा… 3.32 कोटींचा मुद्देमाल जप्त !

 

नांदेड | दि. १२ जानेवारी
नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोठी धडक कारवाई करत ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोहा तालुक्यातील येळी येथील नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर करण्यात आली. रविवार, ११ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की येळी परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रात्री सुमारे १०.३० वाजता स्वतः घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. (nanded illegal sand mining action-3.32 crore seized)

 

 

Ajit Pawar Pune Manifesto 2025 | “मोफत मेट्रो, रोज पाणी, 200 क्लिनिक! अजित पवारांचा पुण्यासाठी ‘मेगाप्लॅन’

 

तपासादरम्यान नदीपात्रात ३ हायवा ट्रक, ७ जेसीबी, १ मोठी फायबर बोट आणि ४ तराफे अवैध उत्खननासाठी वापरात असल्याचे आढळून आले. तत्काळ स्थानिक पोलीस व तहसील प्रशासनाला पाचारण करून सर्व यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे ४५ ब्रास वाळूचा साठा देखील ताब्यात घेण्यात आला असून, जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत ३ कोटी ३२ लाख रुपये असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जप्त केलेले सर्व साहित्य तहसील कार्यालय, लोहा येथे जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून, संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 

 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, “नांदेड जिल्ह्यात अवैध उत्खनन आणि वाळूची बेकायदेशीर वाहतूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. अशा कारवायांमुळे गुन्हेगारांवर निश्चितच आळा बसेल.”

 

 

“गुन्हेगारांना थेट तुरुंगात पाठवणार ! पुण्यात फडणवीसांचा कडक इशारा”

 

 

❓ प्रश्न व उत्तरे

Q1. नांदेडमध्ये ही कारवाई कुठे झाली?
➡️ लोहा तालुक्यातील मौजे येळी येथील नदीपात्रात ही कारवाई झाली.

Q2. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल किती किमतीचा आहे?
➡️ एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ कोटी ३२ लाख रुपये आहे.

Q3. कोणकोणती वाहने आणि यंत्रे जप्त झाली?
➡️ ३ हायवा ट्रक, ७ जेसीबी, १ फायबर बोट, ४ तराफे आणि ४५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली.

Q4. ही कारवाई कोणी केली?
➡️ नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

Q5. पुढील कारवाई काय असणार आहे?
➡️ जप्त साहित्य तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून दोषींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई सुरू आहे.

 

Local ad 1