पुणे, सध्या देशभरात फिटनेसकडे नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. फुटबॉल टर्फ, मॅरेथॉन, बॅडमिंटन, जिम, क्रॉसफिट आणि ट्रेकिंगसारख्या उपक्रमांमध्ये विशेषतः तरुणांचा सहभाग वाढला आहे. आरोग्यासाठी हा सकारात्मक बदल असला तरी क्रीडा दुखापतींच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. विशेष म्हणजे या दुखापती खेळामुळे नव्हे, तर अनियमित आणि अचानक वाढलेल्या शारीरिक हालचालींमुळे होत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, ‘वीकेंड अॅथलीट सिंड्रोम’ ही समस्या सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. आठवडाभर बैठ्या जीवनशैलीत काम केल्यानंतर सुट्टीच्या दिवशी अचानक उच्च तीव्रतेचा खेळ किंवा व्यायाम केल्याने शरीरावर अतिरिक्त ताण पडतो. हृदय हा ताण सहन करू शकते; मात्र स्नायू, सांधे आणि लिगामेंट्स पुरेशी तयारी नसल्याने दुखापती होण्याचा धोका वाढतो.
ACL दुखापती का वाढत आहेत?
गुडघ्यातील ACL (Anterior Cruciate Ligament) हे लिगामेंट गुडघ्याला स्थिरता देण्याचे महत्त्वाचे काम करते. अचानक दिशा बदलणे, धावताना वेगाने थांबणे किंवा वळणे अशा हालचालींमध्ये ACL वर मोठा ताण येतो. फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळताना अनेक वेळा कोणताही धक्का न लागता ACL फाटण्याच्या घटना घडतात. दीर्घकाळ ऑफिसमध्ये बसून काम करणारी व्यक्ती अचानक खेळताना पाय जागीच राहून शरीर वळल्यास “पॉप” असा आवाज येतो आणि काही तासांत गुडघा सुजतो. ही ACL दुखापतीची सामान्य लक्षणे मानली जातात.
खांद्याच्या दुखापतींकडे दुर्लक्ष धोकादायक
गुडघ्यांसोबतच खांद्याच्या दुखापतींचे प्रमाणही वाढत आहे. ओव्हरहेड व्यायाम, वजन उचलणे, पुल-अप्स किंवा चुकीच्या तंत्रामुळे खांद्यावर ताण येतो. सुरुवातीला हलका त्रास जाणवत असतानाही अनेकजण व्यायाम सुरू ठेवतात. परिणामी काही दिवसांत साध्या हालचाली करतानाही वेदना जाणवू लागतात आणि समस्या गंभीर बनते.
दुखापती टाळण्यासाठी काय कराल?
खेळ किंवा व्यायाम पूर्णपणे बंद करण्याची गरज नसून योग्य तयारी आवश्यक आहे.
- खेळापूर्वी ८ ते १० मिनिटे वॉर्म-अप करणे
- आठवड्यातून किमान दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग
- गुडघे व खांद्यांसाठी योग्य हालचालींचा सराव
- हालचाली बदलणारी वेदना दुर्लक्षित न करणे
नियमित तयारी आणि योग्य तंत्र वापरल्यास क्रीडा उपक्रमांचा आनंद घेताना दुखापती टाळता येतात. सक्रिय जीवनशैली महत्त्वाची असली तरी उत्साहापेक्षा शरीराची तयारी अधिक गरजेची असल्याचे डॉ. सना अहमद सय्यद यांनी सांगितले.
डॉ. सय्यद्स ऑर्थोपेडिक क्लिनिक
NIBM रोड, कोंढवा, पुणे
📞 97171 65642
🌐 www.drsanaahmedsayyad.com

