दिवाळीत नांदेड-पुणे रेल्वे प्रवास करणार आहात?
दिवाळीनिमित्त नांदेड ते हडपसर (पुणे) तिसरी विशेष रेल्वे
नांदेड : दिवाळी दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी होत आहे. त्यामुळे खासगी बस चालकांकडून प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway) हुजूर साहिब नांदेड ते हडपसर (पुणे) (Nanded to Hadapsar (Pune) दरम्यान आणखी एक विशेष रेल्वे (special train) गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे गाडी पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, घाटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डूवाडी, दौंड या रेल्वे स्थानकांवर थांबा असणार आहे. (3rd special train from Nanded to Hadapsar (Pune) on the occasion of Diwali)
22 डब्बे असतील
- गाडी क्रमांक 07405 हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दिनांक 25 ऑक्टोबर, 2022 रोजी मंगळवारी सायंकाळी 17.40 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, अंकाई, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कोर्ड लाईन मार्गे हडपसर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 07.10 वाजता पोहोचेल. तसेच परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 07406 हि गाडी हडपसर रेल्वे स्थानकावरून दिनांक 26 ऑक्टोबर, 2022 रोजी बुधवारी दुपारी 15.10 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल.
19 डब्बे असतील
- गाडी क्र. 07403/07404 नांदेड-हडपसर-नांदेड हि एक विशेष गाडी परभणी, परळी, लातूर मार्गे धावेल. हि गाडी नांदेड येथून 23 ऑक्टोबर आणि हडपसर येथून 24 ओक्टोबर रोजी सुटेल. या गाडीत 22 डब्बे असतील. (3rd special train from Nanded to Hadapsar (Pune) on the occasion of Diwali)