राजकारण करा, पण मर्यादा पाळा – मस्तानी प्रकरणावर खसादार मेधा कुलकर्णींचा टोला
मस्तानीच्या नावाने वाद निर्माण करून गलिच्छ राजकारण करणे योग्य नाही
पुणे, पुणे शहरात घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, अपुरा पाणीपुरवठा, खराब रस्ते आणि बेकायदा बांधकामांसारख्या अनेक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी महापालिका प्रशासनावर कठोर शब्दांत टीका केली आहे. शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने त्यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. (BJP MP Medha Kulkarni Slams Civic Body On Urban Issues)
खासदार कुलकर्णी म्हणाल्या, “वर्षानुवर्षे पायाभूत सुविधांचा अभाव पुणेकरांना भेडसावत आहे. लोकांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी पार पाडताना मी त्यांच्या अडचणी स्पष्टपणे मांडणार आहे.”
पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी ; वनाज – चांदणी चौक आणि रामवाडी – वाघोली नवीन मार्ग
वाहतूक कोंडीसंदर्भात त्यांनी सांगितले की, अरुंद रस्ते, चुकीचे नियोजन आणि महापालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे पुणेकरांना शहरातच दीर्घ प्रवासाचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, विशेषतः गंगाधाम चौकात. येथे उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याला अडथळा आणणाऱ्यांची माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मोठी बातमी : पुणे शहरातील ११ हजार पथविक्रेत्यांना बिल आकारणी होणार
नदी सुधार प्रकल्पावरही सवाल
मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी पर्यावरण हानी आणि निधीचा अपव्यय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “नदीपात्राचे कॉंक्रिटीकरण, झाडांची कत्तल आणि नैसर्गिक अधिवासाची हानी हा प्रकल्प करताना टाळली जात नाही,” असे म्हणत त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी या प्रकल्पाला विरोध दर्शवला.
“टीका करा, पण मर्यादेत रहा”
पुणे रेल्वे स्थानकाला ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याच्या मागणीवरून निर्माण झालेल्या वादावर त्यांनी भाष्य केले. “लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र, मस्तानीच्या नावाने वाद निर्माण करून गलिच्छ राजकारण करणे योग्य नाही. अशा प्रकारच्या खालच्या पातळीवरील टीकेवर कारवाई झाली पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारचा ‘प्रभागराज’ ! महापालिकांच्या निवडणुकांत सत्ताधाऱ्यांचा डाव?
तो झारीतील शुक्राचार्य कोण ?
गंगाधाम चौकातील अपघात थाबवण्यासाठी तेथे प्रशासनाने उड्डाणपुल प्रस्तावित केला आहे. मात्र, अनेक वर्षापासून हा विषय मार्गी लागलेला नाही. हा उड्डाणपूल होऊ न देणारा झारीतील शुक्राचार्य कोण आहे, याची माहिती प्रशासनाने घ्यावी. पुण्यात वाहतूक कोंडी हा प्रश्न गंभीर आहे. मुंबईला जातांना जेवढा वेळ लागतो, तेवढाच वेळ हडपसरला जातांना लागतो. शहराचा विकास करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला. मात्र, विकास आराखड्याप्रमाणे रस्त्यांची रुंदी केली जात नाही. त्यामुळे शहरात वाहतुककोंडी होते. रस्त्याची रुदी आराखड्याप्रमाणे केली जावी, अशी मागणीही खा. कुलकर्णी यांनी यावेळी केली.
आयुक्त बुडत्या जहाजेचे कॅप्टन !
“पुण्याचे नागरी जीवन हलाखीचे झाले असून, अशा परिस्थितीत शहराची सुधारणा करण्याची जबाबदारी आयुक्त नवल किशोर राम यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यांना बुडत्या जाहजाचे कॅप्टन करण्यात आले आहे. त्यांच्याकडून पुणेकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. ड्रेनेज लाईन, कचरा, पाणी प्रश्न यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत.असेही खा. कुलकर्णी म्हणाल्या.