पुणे : नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार आणि हत्येप्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तातडीने निकाल लावण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार आणि उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर विशेष फास्ट ट्रॅक ट्रायल कोर्ट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Pune School News : पुण्यातील 13 अनधिकृत शाळांची यादी जाहीर ; पालकांना प्रवेश न घेण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती देताना सांगितले की, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रशासन आणि सरकार प्रयत्नशील आहे. विशेष न्यायालयात उच्च विधिज्ञ आणि कायदे तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार असून, प्रकरणाची जलद सुनावणी केली जाणार आहे.
Land Acquisition Corruption : भूसंपादनातील भ्रष्टाचारावर सरकारचा मोठा अॅक्शन !
सध्या पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास केला असून पोस्टमॉर्टम अहवालात अत्याचार आणि क्रूर मारहाणीचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. पोलिसांकडून पुढील १५ दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाणार असून, आरोपीला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणात जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

