Nasarapur girl case । नसरापूर चिमुरडी प्रकरणात आरोपीला ५ दिवसांची कोठडी ; फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार खटला
Nasrapur girl case । पुणे, नसरापूर येथील चिमुरडीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक केली असून, हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, माहिती पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी दिली.
नसरापूर गावात चिमुरडीवर अत्याचारप्रकरणात नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ५ पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयातून आरोपिला बाहेर घेऊन जाताना महिलांनी पोलिसांची गाडी आवडून कांबळेला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली.
नसरापुर अत्याचार घटनेनंतर सातारा महामार्गावर ग्रामस्थांचा तीव्र संताप
भीमराव कांबळे हा शेतमजूर असून, मिळेल ते कामे करतो. नसरापूर गावात देखील तो कामानिमित्त आलेला होता. तो मिळेल तो कामे करत भोरमधील वेगवेगळ्या गावात फिरत असतो. मात्र, त्याने शुक्रवारी घृणास्पदप्रकार केला. दरम्यान, कांबळे याच्यावर यापुर्वीचेही दोन विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा हा १९९८ चा तर दुसरा गुन्हा २०१५ मधील असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही गुन्ह्यात त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे हे विशेष!
पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे रात्रीत मेडिकल केले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले. दरम्यान, त्याने नेमके चिमुरडीला कसे मारले हे मात्र समजू शकलेले नाही. त्यासंदंर्भात पोलिस तपास करत असून, सीसीटीव्हीत आरोपी चिमुरडीला सोबत घेऊन गोठ्यात शिरताना दिसून आला आहे. मुलगी आजीच्या घराजवळ खेळत होती. तेथून गोठा जवळपास अर्धा किलोमिटर आहे. त्यामुळे त्याने नेमके कशाचे आमिष दाखवून मुलीला त्याने इथपर्यंत आणले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

