जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांवर अजित पवारांचे लक्ष ; भाजप जिल्हाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष केंद्रीत केले असून, त्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता ग्रामीण भागातील सत्ता कायम ठेवण्यासाठी अजित पवार सक्रिय झाले असून, भाजपाच्या पुणे उत्तर जिल्हाध्यक्षांनाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश देण्यात आला आहे. (ajit pawar focus on zp panchayat samiti elections sharad butte patil join ncp)
व्हिडिओ : बहादूर सुरक्षा रक्षकाची उडी ; खडकवासला धरणात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचले
भाजपाचे पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “शरद बुट्टे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणजे खरं तर घरवापसी आहे. पक्ष स्थापनेपासून ते जुने कार्यकर्ते आहेत. आम्ही चांगले कार्यकर्ते घडवतो, पण इतर पक्षही अशा कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. शरदला देखील इतर पक्षाने संधी दिली आणि त्यांनी त्याचा फायदा घेतला,” असे सांगत अजित पवारांनी भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली.
https://www.facebook.com/share/p/1AWLJrpSU2/
आपला राजकीय अनुभव सांगताना अजित पवार म्हणाले, “१९९१ साली मला खासदारकीचे तिकीट मिळाले होते. त्या वेळी मी अवघ्या साडेतीन लाख रुपयांत खासदार झालो होतो. आज मात्र तेवढ्या पैशात साधे जेवणही होत नाही. गेल्या ३५ वर्षांत राजकारणाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे,” असे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेतील सध्याच्या ताकदीचा उल्लेख करताना अजित पवार म्हणाले, “आपले ७३ जिल्हा परिषद सदस्य आहेत. १३ पंचायत समित्यांवर आपली सत्ता आहे. राजगुरूनगर-खेड आणि जुन्नर पंचायत समिती १६ सदस्यांची आहे. इंदापूरही बहुधा १६ ची आहे. बारामती मात्र १२ चीच आहे,” असे म्हणत त्यांनी विनोदी शैलीत भाष्य केले, ज्यामुळे सभागृहात हशा पिकला. पुढे ते म्हणाले, “आता काही आमदारकीची निवडणूक नाही, त्यामुळे टीका-टिप्पणी टाळतो. पण गोड बोलण्यासोबत कामही झाले पाहिजे. खेड तालुका आणि राजगुरूनगर परिसराने राष्ट्रवादी काँग्रेसला स्थापनेपासून मोठी ताकद दिली आहे,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

