राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद ; जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता
मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज (मंगळवार) जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त *राजे* आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. (maharashtra local body elections announcement-2025)
Sa निवडणुका दोन ते तीन टप्प्यांत होऊ शकतात.
* पहिल्या टप्प्यात : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका,
* दुसऱ्या टप्प्यात : नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका,
*तिसऱ्या टप्प्यात : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन वर्षांपासून या संस्थांवर प्रशासक कार्यरत आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, वेळेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यात सध्या एकूण ३२ जिल्हा परिषद, ३३६ पंचायत समिती, २४६ नगरपालिका, ५२ नगरपंचायत आणि ३२ महानगरपालिका यांचा समावेश आहे.

