पुणे विभागात 298 टँकर, पण संकट सुटलेलं नाही! , मंगळवेढा आणि सांगोला ताहनलेलच
जत, मंगळवेढा, सांगोला हे आघाडीवर
पुणे. राज्यातील टंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठ्यासाठी टँकर सेवा सक्रिय करण्यात आली असून, मंगळवार दिनांक 10 जून रोजी पुणे विभागात एकूण 298 टँकर कार्यरत आहेत. यामध्ये 54 शासकीय तर 244 खाजगी टँकरांचा समावेश होता. एकूण 1,03,228 लिटर पाणीपुरवठा या टँकरांद्वारे करण्यात आला आहे. (tanker water supply pune division june 2025)
कलम १५५ चे डिजिटल रूपांतर ; सातबारा उताऱ्यातील दुरुस्त्या होणार ऑनलाईन
जत, मंगळवेढा, सांगोला हे आघाडीवर
अहवालानुसार सोलापूर जिल्ह्यातील जत तालुक्यात सर्वाधिक 94 टँकर वापरण्यात आले. यातून तब्बल 45,455 लिटर पाणी पुरवण्यात आले. त्यानंतर मंगळवेढा तालुक्यात (मंगळवेढा टँकर) 56 टँकर (21,139 लिटर) आणि सांगोला तालुक्यात 36 टँकर (5,817 लिटर) कार्यरत होते. ( Pune water crisis 2025)
इतर तालुक्यांतील स्थिती
दक्षिण सोलापूर : 16 टँकर | 10,633 लिटर
करमाळा : 12 टँकर | 3,539 लिटर
इंदापूर : 1 टँकर | प्राथमिक पूरक जलपुरवठा
उत्तर सोलापूर : 1 टँकर | 4,130 लिटर
काही भागांत टँकर वापर शून्य
भोर, खटाव, बारामती, दौंड, आदी तालुक्यांमध्ये कोणतेही टँकर कार्यरत नव्हते. त्यामुळे या भागातील परिस्थिती आटोक्यात असल्याचे संकेत मिळतात. (Pune tanker water supply)
मागील दिवसांच्या तुलनेत वाढ
8 आणि 9 जून रोजीच्या तुलनेत टँकर वापरात वाढ झाली असून, उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यातही अनेक भागांत पाणीटंचाई कायम असल्याचे यावरून स्पष्ट होते. राज्यात उन्हाळा अंतिम टप्प्यात असताना पुणे विभागात अद्यापही अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून, सरकारकडून टँकर सेवा सुरू आहे. आजच्या विभागीय अहवालानुसार, एकूण 298 टँकर कार्यरत होते. यामध्ये 54 शासकीय आणि 244 खाजगी टँकर कार्यरत होते. (जत पाणीटंचाई)
📝 संदर्भ : पुणे विभागीय टँकर अहवाल – दिनांक 10 जून 2025