...

पुण्यात ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात कोथरूड आघाडीवर !

 चंद्रकांत पाटील यांचे तीन प्रकल्प मार्गी ; इतर आमदारांची निष्क्रियता ठळक

पुणे | प्रतिनिधी

kothrud leads pune missing link project – पुणे महानगरपालिकेच्या पथविभागाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात (Missing Link Project in Pune) कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हेचआघाडीवर असून, त्यांनी या भागातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना यशस्वीपणेपूर्ण केले आहे. मात्र, भाजप आणि महायुतीचे इतर सहा आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाएक आमदार या कामात निष्क्रिय दिसत आहेत. त्यामुळे पुण्यातील इतर भागांत ‘मिसिंगलिंक’ प्रकल्प राबविण्यात विलंब होत आहे, अशी तक्रार प्रशासनाकडून होत आहे.(kothrud leads pune missing link project)

 

UPI सेवांमध्ये बदल : ऑटो टॉप-अप, वाढवलेली मर्यादा आणि नवीन सुरक्षा उपाय काय आहेत

 

पुणे महापालिकेच्या ‘मिसिंग लिंक’ (कोथरूड मिसिंग लिंक) योजनेत कोथरूड मतदारसंघाने आघाडीघेतली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कोथरूडमधील तीनमोठे रस्ते प्रकल्प मार्गी लागले आहेत. मात्र, भाजपच्या इतरसहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका आमदाराला मात्र अपेक्षित यशमिळालेले नाही. चंद्रकांत पाटील कोथरूड  मतदारसंघात ‘मिसिंग लिंक’  (PMC Projects) प्रकल्पाला गती; इतर आमदार अपयशी?कात्रज ते देहू बायपास महामार्गाला जोडणाऱ्या कोथरुड मतदार संघातील महात्मा सोसायटी जवळील ‘मिसिंग लिंक’चे काम पूर्ण झाले असून, यामुळे कोथरुड परिसरातील वाहन चालकांना महामार्गावर जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे.

 

kothrud leads pune missing link project

 

 

आता एकलव्य कॉलेज जवळील रस्ताही लवकरच खुला होणार आहे. तसेच, सुतारवाडी येथील ‘मिसिंग लिंक’च्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही लिंक देखील कोथरुड मतदार संघातच आहे. याशिवाय, कर्वे रस्ता ते पौड रस्ता जोडणाऱ्या छोट्या ‘मिसिंग लिंक’चे कामही पूर्ण झाले असून, सदर रस्ता सध्या दुचाकींसाठी खुला करण्यात आला आहे. – पुणे महापालिका रस्ते प्रकल्प

 

शहरातील इतर आमदार अपयशी?

पुणे शहरात भाजपचे सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे एक असे एकूण सात सत्ताधारी आमदार असताना केवळ कोथरुड मतदारसंघातीलच कामांना प्राधान्य मिळाले आहे. कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘मिसिंग लिंक’च्या कामांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. दुसरीकडे, इतर आमदारांकडून मात्र या कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या PMC मध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने अशी अपेक्षा होती की आमदारांनीच पुढाकार घ्यावा, मात्र सातत्याने बैठकांचा आढावा घेतला तरीही ही कामे मार्गी लागताना दिसत नाहीत.

 

दोन आमदारांमध्ये मतभेद?

गंगाधाम चौकातील वाहतूक कोंडी ही शहरातील गंभीर समस्या ठरत असून, यासाठी वाहतूक पोलिसांनी महिनाभर निरीक्षण करून उपाययोजनांचा अहवाल महापालिकेला सादर केला आहे. तथापि, या चौकात ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल कसा असावा, यावरून सत्ताधारी पक्षातील दोन आमदारांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने हे कामही रखडले आहे, अशी चर्चा ही रंगली आहे.

 

“मिसिंग लिंकसाठी भूसंपादन आणि निधी मिळवणे ही मोठी अडचण आहे. कोठेप्रकल्प पूर्ण झाले, तिथे वाहतूक सुरळीत झाली आहे.”– अनिरुद्ध पवासकर, विभाग प्रमुख पथ विभाग, पुणे मनपा

 

काय आहे ‘मिसिंग लिंक‘ योजना?

पुणे शहरात अनेक ठिकाणी रस्ते पूर्णपणे जोडलेले नाहीत किंवा तिथे जागा नसल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या समस्येवर उपाय म्हणून पुणे मनपाने ‘मिसिंग लिंक’ योजना राबविली असून, यात एकूण ३० जागा रस्त्यांसाठी ताब्यात घेऊन त्वरित कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ८५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. -पुणे इन्फ्रास्ट्रक्चर

 

कोथरूडमध्ये 3 प्रकल्प मार्गी?

महात्मा सोसायटी ते बायपास मिसिंग लिंक  एकलव्य कॉलेजजवळील लिंक – जागा ताब्यात; कामास सुरुवात होणार

सुतारवाडी लिंक – निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

कर्वे रस्ता ते पौड रस्ता दुचाकी मार्ग

 

Local ad 1