🩸 शंकर महाराज समाधी मठात ५०व्या महोत्सवी रक्तदान शिबिराचे आयोजन; ३२१ भाविकांचे रक्तदान
पुणे – श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठात सुवर्ण महोत्सवी – Golden Jubilee Year at Shri Sadguru Shankar Maharaj Samadhi Mathम्हणजेच सलग ५०व्या दुर्गाष्टमी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार उल्हास पवार आणि उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. शिबिरात ३२१ भक्तांनी रक्तदान करून समाजसेवेत योगदान दिले. (shankar maharaj 50th blood donation camp)
UPI सेवांमध्ये बदल : ऑटो टॉप-अप, वाढवलेली मर्यादा आणि नवीन सुरक्षा उपाय काय आहेत
सलग ५० महिन्यांचे रक्तदान शिबिर – एक विक्रम
शंकर महाराज समाधी ट्रस्ट ही राज्यातील एकमेव संस्था आहे, जी दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला सलग ५० महिने रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. याअद्वितीय उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाने संस्थेला गौरवचिन्ह देऊन सन्मानित केले आहे.
दैनंदिन अन्नदान उपक्रम – ट्रस्टमार्फत दररोज सुमारे ५,००० विद्यार्थ्यांना मोफत खिचडी प्रसाद वितरित केला जातो. याव्यतिरिक्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भाऊ रंगारी गणपती मंडळ, धर्मवीर संभाजी शाळा (नवी पेठ) या ठिकाणीही नियमित भोजन प्रसाद वाटप केले जाते, अशी माहिती विश्वस्त सुरेंद्र वाईकर यांनी दिली.
“धार्मिक संस्था समाजोपयोगी कार्यात पुढे याव्यात” – माजी आमदार उल्हास पवार
“धार्मिक संस्था केवळ अध्यात्मापुरत्या मर्यादित न राहता समाजासाठी उपयुक्त उपक्रम राबवावेत, जेणेकरून तरुण पिढीला आध्यात्मिकतेसोबतच सेवाभावाची प्रेरणा मिळेल,” असे आवाहन आमदार उल्हास पवार यांनी यावेळी केले.
“अन्नदानासाठी साथ देण्याचे आश्वासन” – युवा उद्योजक पुनीत बालन (Young entrepreneur Puneet Balan) यांनी मठाच्या अन्नदान उपक्रमासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. शिबिर समन्वयक श्री राम बांगड यांना यावेळी विशेष सन्मानित करण्यात आले.
ट्रस्टचे विश्वस्त मंडळ : डॉ. मिहीर कुलकर्णी (अध्यक्ष), सतीश कोकाटे (सचिव), सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी आणि प्रताप भोसले उपस्थित होते.