क्रिकेटमधील नियमात झाला बदल, काय ते जाणून घ्या..

मुंबई : महिला प्रीमियर लीगचा (Women’s Premier League 2023) पहिला हंगाम सुरु असून, पहिल्या दोन दिवसांत तीन सामने झाले. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यात खेळल्या गेलेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात धावसंख्या 200 पार गेली, तर दुसऱ्या दिवशी दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात ही धावसंख्या 200 पार गेली होती. विशेष म्हणजे, दोन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे या स्पर्धेत एका नव्या नियमाची सुरुवात करण्यात आली आहे.(The rules in cricket have changed, know what..)

 

 

Women’s Premier League 2023  पासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवा नियम सुरू झाला आहे. आता खेळाडूंना नो बॉल आणि वाइड बॉलवरही रिव्ह्यू घेता येणार आहे. म्हणजेच, आतापासून अंपायरच्या कोणत्याही निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकते. नवा नियम वापरण्यास खेळाडूंनी सुरुवातही केली आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यात खेळवल्या गेलेल्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वात आधी त्याचा वापर केला. (The rules in cricket have changed, know what..)

 “आयपीएल 2023 पासून, डीआरएस प्रणालीमध्ये आणखी एक नियम समाविष्ट करण्यात आला आहे. (Women’s Premier League 2023) ज्यामध्ये खेळाडू वाइड आणि नो बॉलला चॅलेंज करून रिव्ह्यू घेऊ शकतील. (The rules in cricket have changed, know what..)

Women’s Premier League 2023 महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळाडूंनी या नवीन नियमाचा वापर केला आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात, मुंबईची फिरकीपटू सायका इशाकचा चेंडू मैदानी पंचांनी लेग साइडच्या बाजूने वाइड डाउन ठरवला. मुंबईनं डीआरएसचा वापर करून निर्णयाचा रिव्ह्यू केला आणि चेंडू बॅट्समन मोनिका पटेलच्या हातमोजेला लागल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. (The rules in cricket have changed, know what..)

Local ad 1