आजपासून आर्थिक व्यवहारांच्या नियमात बदल, काय आहेत ते जाणून घेऊया..

नवी दिल्ली :  आजपासून (July 1, 2022) आर्थिक व्यवहारांबाबतच्या नियमात बदल झाले आहेत. तसेच काही वस्तूंच्या दरांतही वाढ लागू झाली आहे. या बदलांचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर (Daily financial transactions) आणि खिशावरही होणार आहे. काय आहेत नेमके बदल जाणून घेऊया. (Find out what are the changes in the rules of financial transactions from today)

 

 

केंद्र सरकारने आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 निश्चित केली आहे. 30 जून 2022 पर्यंत 500 रुपयांच्या दंडासह आधार-पॅन लिंक (aadhaar-pan link) करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर आता एक जुलैपासून या दंडाच्या रक्कमेत वाढ होणार असून 1000 रुपयांच्या दंडासह आधार-पॅन कार्ड लिंक (aadhaar-pan link) करता येणार आहे. (Find out what are the changes in the rules of financial transactions from today)

 

 

1 जुलैपासून ऑनलाइन शॉपिंग कंपन्या, व्यापारी आणि पेमेंट गेटवे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा सेव्ह करू शकणार नाहीत. बँक ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँक 1 जुलैपासून कार्ड टोकनायझेशन प्रणाली सुरू करणार आहे. या अंतर्गत, कार्डचे तपशील टोकनमध्ये रूपांतरित केले जातील. ऑनलाइन व्यवहाराची ही एक सुरक्षित पद्धत असणार आहे.

 

 

 

उद्योग आणि विविध व्यवसायांमधून मिळणाऱ्या भेटवस्तूंवर 1 जुलै 2022 पासून 10 टक्के टीडीएस लागू होणार आहे. हा कर सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि डॉक्टरांनाही लागू होणार आहे. (Find out what are the changes in the rules of financial transactions from today)

 

 

 

एक जुलैपासून देशात दुचाकींच्या किंमतीत वाढ होणार आहे. हीरो मोटोकॉर्पने आपल्या वाहनांच्या किंमतीत तीन हजार रुपयांनी वाढ केली आहे. कच्च्या मालाची वाढती किंमत आणि महागाई यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. (Find out what are the changes in the rules of financial transactions from today)
IT कायद्याच्या नवीन कलम 194S अंतर्गत, 01 जुलै 2022 पासून, क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार एका वर्षात 10 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्यावर एक टक्के शुल्क आकारले जाईल. आयकर विभागाने व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तांसाठी अधिसूचना जारी केली आहे.  (Find out what are the changes in the rules of financial transactions from today)

 

 

डिमॅट आणि ट्रेडिंग खात्यासाठीची केवायसी प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत 30 जूनपर्यंत करावी लागणार आहे. एक जुलै नंतर तुम्ही KYC अपडेट करू शकणार नाही. यापूर्वी, डिमॅट खात्यांसाठी केवायसी 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते, परंतु सेबीने अंतिम मुदत 30 जूनपर्यंत वाढवली.

 

 

आजपासून, ज्या गृहकर्ज ग्राहकांची गृहकर्ज रीसेट तारीख 1 जुलै 2022 आहे त्यांच्यासाठी EMI महाग होतील. ज्यांची होम लोन रिसेट तारीख 1 जुलै आहे त्यांना या महिन्यापेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. (Find out what are the changes in the rules of financial transactions from today)

Local ad 1