मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी

पुणे । भारत निवडणूक आयोगामार्फत (Election Commission of India) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० मध्ये सुधारणा करण्यात आल्याने वयाची १८ वर्ष पुर्ण होणाऱ्या व्यक्तींना १ जानेवारी २०२३,  १ एप्रिल २०२३, १ जुलै २०२३ व १ ऑक्टोबर २०२३ रोजी असे  वर्षातून चार वेळा   मतदार नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. (Voter registration now available four times a year)

 

 

सद्यस्थितीत भारत निवडणूक आयोगाचा छायाचित्र मतदार यादीचा (Electoral Roll) विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यानुसार ८ डिसेंबरपर्यंत  दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये मतदार यादीत अजून नाव समाविष्ट नसलेल्या १८ वर्षावरील सर्व पात्र व्यक्तीना नाव नोंदविण्यासाठी नमुना अर्ज भरता येणार आहे. (Voter registration now available four times a year)

पात्र नागरिकांनी यासंधीचा लाभ घेऊन सर्व  त्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळावरुन तसेच, Voter Helpline App आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन नमुना अर्ज  क्र.६ भरावा किंवा आपल्या नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. (Voter registration now available four times a year)

मुख्य निवडणूक अधिकारी (Chief Electoral Officer) यांच्या निर्देशानुसार २६ व २७ नोव्हेंबर २०२२  रोजी तृतीयपंथी समुदाय, देहव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि भटक्या व विमुक्त जमातींच्या व्यक्तींसाठी नियोजित ठिकाणी व ३ व ४  डिसेंबर २०२२ रोजी सर्व नागरिकांसाठी मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी सर्व अर्हता पात्र नागरिकांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. (Voter registration now available four times a year)

Local ad 1