Pune Crime News। 88 लाखांचा विदेशी मद्याचा साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Pune Crime News । पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरुन (National Highway) विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक (Transport of foreign liquor) सातत्याने होत असते. त्यात विशेष करुन गोवा राज्यातील मद्यसाठ्याचा समावेश आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) कारवाई करत असतो. राज्य उत्पादन शुल्क, तळेगांव विभाग पथकाने केलेल्या कारवाईत तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत ८७ लाख ८९ हजार ५२० रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह एकूण १ कोटी ५ लक्ष ७ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime News. 88 lakh foreign liquor stock seized)

 

 

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai Highway), हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा रचून गोवा राज्य निर्मीत आणि केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या भारत बेंझ कंपनीच्या ट्रक क्र.एम एच ४६ एफ – ६१३८ या क्रमांकाचा ट्रक जप्त करुन कारवाई करण्यात आली. (Pune Crime News. 88 lakh foreign liquor stock seized)

या ट्रकमध्ये  रिअल व्हिस्की ७५० मि.ली चे ४ हजार १६४ सीलबंद बाटल्या व रिअल व्हिस्की १८० मि.ली चे ५ हजार ७६० सीलबंद बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.ली चे ९ हजार ६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकुण १ हजार २६७ खोके जप्त करण्यात आले. मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत १ कोटी ५ लक्ष ७ हजार ५२० रुपये इतकी आहे. (Pune Crime News. 88 lakh foreign liquor stock seized)

वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २४ वर्षे, रा. मु.पो. तांबोळे, ता. मोहोळ) व  देविदास विकास भोसले (वय-२९ वर्षे रा. मु.पो. खवणी, मोहोळ जि. सोलापूर) यांना अटक करुन त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमांतर्गत  गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चरणसिंह राजपूत (Superintendent State Excise Charan Singh Rajput) यांनी दिली आहे. (Pune Crime News. 88 lakh foreign liquor stock seized)

Local ad 1