...

नवनिर्वाचित नगरसेवक वैजनाथ देशमुख यांचा गावकऱ्यांकडून भव्य नागरी सत्कार

 

कंधार (ता. कंधार) : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या कौठा येथील भूमिपुत्र वैजनाथ देशमुख यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यांच्या विजयामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. (vaijnath deshmukh nagari satkar koutha)

 

रेल्वेचा निर्णय की अन्याय? : नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरमधील प्रवाशांची होणार मोठी गैरसोय !

 

अँटो चालक ते नगरसेवक असा प्रेरणादायी प्रवास करत वैजनाथ देशमुख यांनी हे यश संपादन केले आहे. कामाच्या शोधात महानगरात गेले, परंतु कोणतेही राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी सुरुवातीला अँटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. याच काळात त्यांनी अँटो चालक संघटनेची स्थापना करून अध्यक्षपद भूषवले आणि अन्यायाविरोधात सातत्याने लढा दिला.

 

त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत मतदारांनी महानगरपालिका निवडणुकीत त्यांना भरघोस मतांनी विजयी केले. या विजयाच्या निमित्ताने कौठा गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले. गावातील मुख्य रस्त्यावर ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली, फटाके फोडून जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.

 

सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना वैजनाथ देशमुख यांनी जीवनातील अडचणींवर मात करून मिळवलेल्या यशाबद्दल सांगितले. त्यांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम केल्यास यश नक्की मिळते, असा विश्वास व्यक्त केला.

 

गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा खारीक-खोबऱ्याचा हार घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी सभापती माणिक चोपवाड, बालाजी तमकुटे, सरपंच बाबूराव मडके, शिवाजी पन्नासे, राजेश पावडे, व्यंकट सुडंगे, बालाजी कंधारे, माणिक पावडे, सदीप मुद्दे, साईनाथ महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सतीश देशमुख यांनी केले.

Local ad 1