(Take action against Home Minister Anil Deshmukh : Sainath Kolagire) गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करा ः साईनाथ कोळगिरे
नांदेड ः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 केटींच्या वसुलीचा आरोप केला आहे. हे आरोप गंभीर असून, देशमुख यांनी राजीनामा द्यावा, तसेच त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कंधार तालुका भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष साईनाथ कोळगिरे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.(Take action against Home Minister Anil Deshmukh: Sainath Kolagire)
पोलिस दलात उच्चपदस्त अधिकाऱ्यांनी आरोप केला असून, ही बाब गंभीर आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या विश्वासाला तडा गेला आहे. सर्वसामान्या नागरिकांचा सरकारवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (Take action against Home Minister Anil Deshmukh: Sainath Kolagire)