...

रोबोटिक नी सर्जरी की आर्थ्रोस्कोपी? गुडघ्याच्या त्रासासाठी योग्य उपचार कोणता?

आजकाल गुडघेदुखीच्या उपचारांबाबत रुग्णांमध्ये दोन शब्द सर्वाधिक ऐकायला मिळतात आर्थ्रोस्कोपी आणि *रोबोटिक नी सर्जरी*. अनेकांना या दोन्ही शस्त्रक्रिया एकाच प्रकारच्या आधुनिक उपचार पद्धती वाटतात. मात्र प्रत्यक्षात या दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या गुडघ्याच्या समस्यांसाठी वापरल्या जातात. योग्य उपचार निवडण्यासाठी आजाराचे स्वरूप समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 आर्थ्रोस्कोपी : विशिष्ट दुखापतींसाठी प्रभावी उपचार

आर्थ्रोस्कोपी ही लहान छिद्रातून कॅमेऱ्याच्या सहाय्याने केली जाणारी मिनिमली इनवेसिव्ह (Keyhole) शस्त्रक्रिया आहे. गुडघ्यातील ठराविक यांत्रिक समस्यांमध्ये ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते.यामध्ये प्रामुख्याने खालील समस्या उपचारल्या जातात:
* मेनिस्कस (cartilage) फाटणे
* लिगामेंट दुखापत
* गुडघ्यातील loose bodies
* गुडघा अडकणे किंवा लॉक होणे
उदाहरणार्थ, एखादा तरुण खेळताना गुडघा वळल्यामुळे अचानक वेदना व गुडघा अडकण्याची समस्या निर्माण झाली आणि तपासणीत मेनिस्कस टिअर आढळला, तर अशा परिस्थितीत आर्थ्रोस्कोपी हा योग्य पर्याय ठरू शकतो.

 गुडघ्याचा संधिवात : पूर्णपणे वेगळी समस्या

गुडघ्याचा संधिवात (Knee Osteoarthritis) हा दुखापतीमुळे नव्हे तर सांध्यातील कूर्चा (cartilage) झिजल्यामुळे होणारा आजार आहे. त्यामुळे अनेकदा “गुडघा साफ करणे” किंवा वॉश करण्याने दीर्घकालीन आराम मिळत नाही. हळूहळू वाढणारी वेदना, सकाळी कडकपणा आणि एक्स-रेमध्ये सांध्याची झीज दिसत असल्यास खालील उपचार अधिक फायदेशीर ठरतात:
* स्नायू मजबूत करणारे व्यायाम
* वजन नियंत्रण
* योग्य इंजेक्शन उपचार
* दैनंदिन हालचालींमध्ये बदल

 नी रिप्लेसमेंट : जीवनमान सुधारण्यासाठीचा निर्णय

जेव्हा गुडघेदुखी रोजच्या आयुष्यावर परिणाम करू लागते. चालणे कठीण होते, जिने चढताना त्रास होतो, झोप बाधित होते आणि औषधे किंवा फिजिओथेरपीचा फायदा कमी होतो — तेव्हा नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. ही शस्त्रक्रिया केवळ वेदना कमी करण्यासाठी नव्हे तर रुग्णाचे जीवनमान सुधारण्यासाठी केली जाते.

 रोबोटिक नी सर्जरी म्हणजे नेमके काय?

रोबोटिक नी सर्जरी म्हणजे रोबोटच्या सहाय्याने केली जाणारी नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेपूर्व नियोजन अधिक अचूक होते तसेच सांध्याची अलाईनमेंट आणि कट्स अधिक नेमकेपणाने करता येतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रोबोट ही फक्त सहाय्यक प्रणाली आहे. रुग्णाला नी रिप्लेसमेंटची गरज असल्यासच रोबोटिक तंत्राचा वापर केला जातो.

योग्य उपचार कसा ठरतो?

* अचानक दुखापत व गुडघा लॉक होणे → आर्थ्रोस्कोपी उपयुक्त ठरू शकते
* प्रगत संधिवात व सतत वेदना → नी रिप्लेसमेंट आवश्यक होऊ शकते
* रोबोटिक किंवा पारंपरिक सर्जरी → रुग्णाची प्रकृती व तज्ज्ञांचा अनुभव महत्त्वाचा. सर्वात आधुनिक उपचारच सर्वोत्तम असेल असे नाही. योग्य निदान आणि आजाराच्या टप्प्यानुसार निवडलेला उपचार हाच सर्वाधिक परिणामकारक ठरतो.
डॉ. सना अहमद सय्यद | ऑर्थोपेडिक व स्पोर्ट्स इन्जुरी तज्ज्ञ, NIBM Road, कोंढवा, पुणे
📞 97171 65642
www.drsanaahmedsayyad.com, www.drsanaahmedsayyad.com
Local ad 1