पिंपरी-चिंचवड (पुणे) – ऑर्थोपेडिक्स आणि नेत्ररोग क्षेत्रात विशेष सेवा देणाऱ्या वेंसर हॉस्पिटलने गुडघा प्रत्यारोपण रुग्णांसाठी अभिनव पुनर्वसन उपक्रम सुरू केला आहे. 48 तासांत पहिले पाऊल**” या नावाने ओळखला जाणारा हा कार्यक्रम रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर केवळ दोन दिवसांत सुरक्षितपणे उभे राहणे, चालणे आणि आत्मविश्वासाने घरी परतणे शक्य करतो. हा उपक्रम वेंसर हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागाच्या पुढाकारातून राबविण्यात आला असून ऑर्थोपेडिक आणि नर्सिंग टीमच्या समन्वयातून रुग्णांच्या जलद व सुरक्षित पुनर्वसनाचा उद्देश साधला जात आहे.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
* शस्त्रक्रियेपूर्वी वेदनानियंत्रण, श्वसन व्यायाम व टाच हालचालींचे प्रशिक्षण.
* शस्त्रक्रियेनंतर पहिल्या दिवशी पलंगावरील व्यायाम, दुसऱ्या दिवशी वॉकरने चालण्याची सुरुवात.
* तिसऱ्या दिवशी जिना चढणे-उतरणे आणि घरातील हालचालींचा सराव.
Related Posts
* रुग्णासाठी ‘होम एक्सरसाईज प्लॅन आणि काळजीवाहू व्यक्तींसाठी विशेष मार्गदर्शन.
वेंसर हॉस्पिटलचा फिजिओथेरपी विभाग दररोज बेडसाईड सत्रे घेतो आणि रुग्णाच्या प्रगतीनुसार डिस्चार्जचे नियोजन करतो. याशिवाय येथे मणक्याचे आजार, क्रीडा दुखापती, ज्येष्ठ नागरिकांसाठी संतुलन प्रशिक्षण आणि फ्रॅक्चरनंतरचे पुनर्वसन या सेवा देखील उपलब्ध आहेत
वेंसर हॉस्पिटलचे सल्लागार ऑर्थोपेडिक व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. भूषण शितोळे म्हणाले, “ऑपरेशन थिएटरमधील रोबोटिक अचूकता तेवढ्याच आत्मविश्वासाने घरी चालण्यात परावर्तित होणे गरजेचे आहे. आमचा ‘48 तासांत पहिले पाऊल’ प्रोटोकॉल शस्त्रक्रिया, वेदनानियंत्रण आणि फिजिओथेरपी यांचा समन्वय साधतो.” पूर्व प्रशिक्षण वर्ग, रोबोटिक शस्त्रक्रिया, बेडसाईड फिजिओ, जिने चढणे, ‘होम प्लॅन’ आणि सहा आठवड्यांपर्यंतच्या फॉलो-अप सत्रांद्वारे रुग्णांचा संपूर्ण पुनर्वसन प्रवास पूर्ण केला जातो.
वेंसर हॉस्पिटल हे आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ आणि रुग्ण-केंद्रीत सेवेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड परिसरात विश्वासार्ह आरोग्यसेवेचे केंद्र बनले
https://www.mhtimes.in Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

