...

हिप सर्जरीनंतर वेदना थांबत नाहीत ? ‘हे’ असू शकते धोक्याचे संकेत ?

वेळेत तपासणीच वाचवते चालण्याची क्षमता

पुणे, हिप (कूल्हा) सर्जरीनंतर सुरुवातीला काही प्रमाणात वेदना, सूज आणि कडकपणा असणे सामान्य मानले जाते. मात्र वेदना सतत वाढत राहणे, चालताना अडचण येणे किंवा लंगडत चालावे लागणे हे गंभीर इशारे असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील उपचार अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात. 55 वर्षीय एका महिलेला (नाव बदललेले – मिसेस चौहान) अशाच समस्येला सामोरे जावे लागले. उजव्या हिप मध्ये सतत वेदना, कडकपणा आणि चालण्यात वाढती अडचण यामुळे त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होऊ लागला. उभे राहणे, थोडे चालणे आणि घरकाम करणेही कठीण झाले. 

आधीची शस्त्रक्रिया आणि समस्या 27 जून 2025 रोजी त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात उजव्या हिपवर Hemiarthroplasty शस्त्रक्रिया करून घेतली होती. या शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होऊन हालचाल सुधारण्याची अपेक्षा असते. परंतु त्यांच्या बाबतीत उलट वेदना वाढत गेल्या. त्यानंतर त्यांनी पुण्यातील व्हेन्सर हॉस्पिटल येथे सल्ला घेतला. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भूषण शितोळे यांनी तपासणी केली. सीटी स्कॅनमध्ये अॅसेटॅब्युलम (कूल्ह्याचा सॉकेट भाग) मध्ये सूक्ष्म झीज, हाडांमध्ये कडकपणा (Sclerosis) आणि इम्प्लांट सैल झाल्याचे दिसून झाले. यावरून Failed Right Hip Hemiarthroplasty with Implant Loosening असे निदान झाले. म्हणजेच आधी बसवलेला सांधा स्थिर राहिला नव्हता.

उपचार : Revision Total Hip Replacement
त्यांना Revision Right Total Hip Replacement (Revision THR) करण्याचा सल्ला देण्यात आला. ही शस्त्रक्रिया 21 जानेवारी 2026 रोजी यशस्वीपणे पार पडली.

शस्त्रक्रियेनंतरचे बदल
* वेदना लक्षणीय कमी
* चालण्याची क्षमता सुधारली
* सांध्यात स्थिरता वाढली
* फिजिओथेरपी आणि नियमित फॉलोअप सुरू

डॉ. भूषण शितोळे म्हणाले, “रिव्हिजन हिप रिप्लेसमेंट ही साधी पुनरावृत्ती नसते. अचूक नियोजन, योग्य तंत्र आणि पुनर्वसन आवश्यक असते. उद्दिष्ट म्हणजे सांधा स्थिर करणे आणि रुग्णाला वेदनामुक्त चालता येणे.”

रुग्णाचा अनुभव
मिसेस चौहान सांगतात, “वेदना वेळेनुसार कमी होतील असे वाटत होते, पण त्या वाढतच गेल्या. कारण समजल्यानंतर दिलासा मिळाला. रिव्हिजन सर्जरीनंतर चालण्यात स्थिरता आली. मला पुन्हा आयुष्य मिळाल्यासारखे वाटते.”

 ⚠ हिप सर्जरीनंतर ही लक्षणे धोकादायक
* अपेक्षित काळानंतरही सतत वेदना
* वाढता कडकपणा
* लंगडत चालणे
* बसून उठताना वेदना
* सांधा सैल वाटणे
* चालण्याचे अंतर कमी होणे

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न 

Q1. हिप सर्जरीनंतर किती काळ वेदना सामान्य असतात?
पहिल्या काही आठवड्यांत सौम्य वेदना व कडकपणा सामान्य असतो. पण वेदना वाढत राहिल्यास तपासणी गरजेची.

Q2. Implant Loosening म्हणजे काय?
बसवलेला कृत्रिम सांधा हाडाला घट्ट न बसणे किंवा सैल होणे.

Q3. Revision Hip Replacement म्हणजे पुन्हा मोठी सर्जरी असते का?
हो, पण ती मूळ सर्जरीपेक्षा अधिक नियोजन आणि तज्ज्ञ कौशल्याची असते.

Q4. रिव्हिजन सर्जरीनंतर चालणे पुन्हा शक्य होते का?
बहुतेक रुग्णांमध्ये वेदना कमी होऊन चालण्याची क्षमता सुधारते.

Q5. फिजिओथेरपी का महत्त्वाची?
सांध्याची हालचाल, स्नायूंची ताकद आणि संतुलन सुधारण्यासाठी अत्यावश्यक.

Local ad 1