...

पुष्पहारांनी स्वागत ! हरकानगरमध्ये काँग्रेस उमेदवारांचा शक्तीप्रदर्शन

pune municipal election 2026 पुणे, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक २२ मधील अखिल भारतीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफीक शेख आणि दिलशाद शेख यांचे हरकानगर वसाहतीत आज नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून जल्लोषात स्वागत केले.

 

 

पुण्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले । Suresh Kalmadi Passed Away

 

या प्रचार पदयात्रेची सुरुवात गोगादेव मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. पदयात्रेत स्थानिक महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला आणि परिसरातील स्थानिक समस्या जाणून घेतल्या. यावेळी उमेदवार इंदिरा अविनाश बागवे यांनी महिलांना बचत गटांच्या माध्यमातून तसेच मुक्त फाउंडेशनच्या सहकार्याने स्वावलंबी करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्ष महिलांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या असून त्या समस्या यशस्वीरीत्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या पदयात्रेत जुबेरबाबू शेख, चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, वीरेंद्र घोसरे, मनीष तांदरे, दयानंद अडागळे, यासर बागवे, मधुकर चांदणे, मारुती कसबे, शफीक शेख, दीपक गायकवाड, फारुक बागवान, जावेद शेख यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Local ad 1