काशेवाडी–डायस प्लॉटमध्ये काँग्रेस-शिवसेनेचा शक्तीप्रदर्शन ! महिलांचा उस्फूर्त पाठिंबा
avinash bagve slum issues lohiyanagar pune election
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरात झोपडपट्टीधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून काशेवाडी–डायस प्लॉट परिसरातही मोठी वस्ती आहे. येत्या काळात झोपडपट्टीवासियांच्या शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सोयीसुविधांसाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन प्रभाग क्रमांक २२-ड चे उमेदवार अविनाश रमेश बागवे यांनी दिले. प्रचाराच्या निमित्ताने ते आज लोहियानगर वसाहतीत पदयात्रेद्वारे प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. (avinash bagve slum issues lohiyanagar pune election)
काशेवाडी–डायस प्लॉट प्रभागातील अखिल भारतीय काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे अधिकृत उमेदवार इंदिरा बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख आणि दिलशाद शेख यांच्या प्रचारात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. ठिकठिकाणी ज्येष्ठ महिलांनी उमेदवारांना प्रेमाने आशीर्वाद दिले, तर महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत पदयात्रेत उत्साह निर्माण केला. या पदयात्रेत माजी राज्यमंत्री रमेश बागवे, मधुकर चांदणे, पप्पू माने, यासर बागवे, दयानंद अडागळे, विजय खेडेकर, राजू भरगुडे, शफीक शेख, बाळू कसबे यांच्यासह काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

