पुणे कॅन्टोमेन्ट बोर्ड निवडणूक कार्यक्रम जाहीर : 30 एप्रिल रोजी होणार मतदान

पुणे : पुणे  कँटोन्मेंट बोर्डाची  (छावणी  परिषद) सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात आता 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 मे रोजी मतमोजणी होणार आहे. (Pune Cantonment Board Election Schedule Announced: Voting will be held on April 30)

 

 

या निवडणुकीकरिता दि. २० व २१ मार्च रोजी सकाळी १० : ३० वा. पासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. (Pune Cantonment Board Election Schedule Announced : Voting will be held on April 30)

 

 

दि. २१ मार्च रोजी सायं. ५ वाजे नंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. पुढे दि. २३ मार्च रोजी सकाळी १० ते ५ वाजे. पर्यंत अर्जाची छाननी करण्यात येईल. दि. २४ मार्च रोजी सायं. ४ वाजे. पर्यंत अर्ज माघार घेण्याची वेळ देण्यात आली आहे. दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायं ६ वा. पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १ मे रोजी मतमोजणी होणार आहे. (Pune Cantonment Board Election Schedule Announced: Voting will be held on April 30)

आठ वॉर्ड आरक्षण

वॉर्ड क्र.  १ : सर्वसाधारण
वार्ड क्रमांक  २  :  महिलांकरिता राखीव
वार्ड क्रमांक ३  : सर्वसाधारण
 वार्ड क्रमांक ४  : अनुसूचित जाती करिता राखीव (sc)
वॉर्ड क्र. ५ व ६ : महिलांकरिता राखीव,
वॉर्ड क्र. ७ आणि ८  : सर्वसाधारण

 

मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी..

बुधवारी निवडणुकीच्या कार्यक्रमाची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली. दि. १ ते ३ मार्च या दरम्यान नव मतदारांना नाव नोंदवता येणार आहे. यावेळी या मतदारांची दि.६ मार्च रोजी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच सैनिक मतदारांची यादी अपडेट करून संबंधित अधिकाऱ्यांकडून मागविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचाही नावाचा समावेश करण्यात येईल. नव मतदारांच्या यादीतील नावावर दि. ८ मार्च रोजी आक्षेप घेण्याची मुदत ठेवली आहे. दि. १३ व १४ मार्च रोजी सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर दि. १७ मार्च रोजी बोर्डाचे अध्यक्ष निर्णय घेतली. त्या कारवाईवर दि. १६ मार्च पर्यंत अपील करण्याची मुदत देण्यात आली.  त्यावर बोर्डाचे अध्यक्ष दि.१७ मार्च रोजी निर्णय घेतील. दि. १८ मार्च रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार

 

 

Local ad 1