...

आपुलकी आणि एकजुटीचा उत्सव; बालेवाडीत अमोल बालवडकर मित्र परिवाराचा स्नेहमेळावा

पुणे | बालेवाडी
नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने हायस्ट्रीट मैदान, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेला स्नेहमेळावा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपुलकी, संवाद, हास्य आणि जिव्हाळ्याच्या नात्यांनी भरलेला हा स्नेहमेळावा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.

 

पुण्यात बनावट स्कॉच व विदेशी मद्याचा 15 लाखांचा साठा जप्त | उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 

या प्रसंगी अमोल बालवडकर यांच्या दिनदर्शिका २०२६ चे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान प्रभागातील विकासकामे, नागरिकांसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच पुढील काळातील विकासाचा संकल्प यावर मनमोकळा संवाद साधण्यात आला.

 

नागरिकांकडून मिळालेला प्रेमळ प्रतिसाद, विश्वास आणि पाठबळ हीच पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा असल्याचे अमोल बालवडकर यांनी यावेळी सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा पाठिंबा कायम राहील, असा विश्वासही उपस्थितांच्या प्रतिक्रियांतून स्पष्टपणे दिसून आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित सर्व नागरिकांचे अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. (amol balwadkar snehmelava balevadi pune)

 

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यापीठ भाग कार्यवाहक संजय वाघुळदे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बालवडकर, कोथरूड उत्तर मंडलाचे अध्यक्ष लहुशेठ बालवडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजपा कोथरूड उत्तर मंडलातील महिला पदाधिकारी, विविध आघाडीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, सोसायटी प्रतिनिधी व अमोल बालवडकर फाउंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Local ad 1