Pune Acb News । पुणे महापालिकेत एसीबीचा ट्रॅप ; एक लाखाची लाच स्वीकारणारा बिगारी अटक

पुणे : आरोग्य विभागातून निवृत्त झालेल्या मुकादमाच्या शिल्लक अर्जित रजेचा धनादेश देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारणार्‍या महापालिकेतील बिगारी कामगार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात अडकला. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Acb News. ACB trap in Pune Municipal Corporation)

 

 

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दत्तात्रय पासलकर (वय 50) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोराचे नाव आहे. त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या प्रकरणात एका 61 वर्षीय सेवानिवृत्त मुकादमाने एसीबीकडे तक्रार केली होती.

 

 

तक्रारदार हे महापालिकेच्या आरोग्य विभागातील मुकादम पदावरून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या शिल्लक अर्जित रजेच्या रोखीकरणाचा धनादेश देण्यासाठी पासलकर याने एक लाख रुपयांची लाच मागितली. परंतु तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या प्रकरणात एसीबीने तक्रारीची पडताळणी करुन महापालिकेच्या आवारात सापळा लावला. त्या सापळ्यात पासलकर लाच घेताना अलगत अडकला.

 

 

एसीबीचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, उप अधीक्षक नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (ACB Superintendent of Police Amol Tambe, Additional Superintendent of Police Sheetal Janve, Deputy Superintendent Nitin Jadhav, Inspector of Police Sriram Shinde) यांच्या पथकाने ही कारवाई केली.  (Pune Acb News. ACB trap in Pune Municipal Corporation)

 

Local ad 1