नांदेड Nanded Crime News : भावातील मालमतेच्या वादात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगे हात पकडले. याप्रकरणी महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. (Clerk of Biloli tehsil office arrested for taking bribe)
बिलोली बस स्थानकासमोरील नरसी-बिलोली रोडवर, बहुजन वंचित आघाडी संपर्क कार्यालय परिसरात दोन हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने अटक केली. याप्रकरणी कारकून धोंडीबा नारायण कोकाटे, (वय ४७ वर्ष) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार यांचा मालमत्तेवरून भावासोबत वाद आहे. तक्रारदार यांना तहसील कार्यालयातील कारकून धोंडीबा कोकाटे यांने सिआरपीसी कलम १४५ प्रमाणेचा प्रस्ताव तहसीलदार यांच्यासमोर ठेवण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच देणे मान्य नव्हते. त्यांनी नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. (Clerk of Biloli tehsil office arrested for taking bribe)