प्रफुल पटेल यांनी सांगितलं शरद पवारांच्या भेटीत काय घडलं ?

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह मंत्र्यांनी रविवारी दुपारी अचानक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre) जाऊन भेट घेतली. या भेटीत काय घडलं याविषयी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी सांगितले. (Praful Patel told what happened in Sharad Pawar’s meeting?)

 

 

शरद पवार यांनी आमच्याशी काहीच भाष्य केले नाही. आम्ही गेल्या गेल्या शरद पवार यांचे पाया पडून आशीर्वाद घेतल्याचंही प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सांगितले. तसेच ही बैठक पूर्वनियोजित नव्हती, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

Praful Patel told what happened in Sharad Pawar's meeting

 

प्रफुल पटेल म्हणाले, आमचे सर्वांचे दैवत, आमचे नेते, आदरणीय शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. वेळ न मागता आम्ही आलो. शरद पवार हे चव्हाण सेंटरला मिटिंग निमित्त आल्याचे कळाले. त्यामुळे संधी साधून आम्ही इथे आलो. पवार साहेबांच्या पाया पडून आशीर्वाद मागितले. सोबत आम्ही सर्वांनी साहेबांना विनंती केली की, आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. राष्ट्रवादी एकसंघ कसा राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Local ad 1