Maharashtra Shikshak Bharti 2023 । राज्यात तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती होणार

Maharashtra Shikshak Bharti 2023 । पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यावर आता राज्य शासनाने शिक्षक भरती (Teacher Recruitment) करण्याचा निर्णय केला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी 50 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी घोषणा केली आहे. (Teacher Recruitment 50 thousand teachers will be recruited)

 

 

केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी  सध्या निवृत्त होणाऱ्या शिक्षकाकडून काम करून घेतलं जाणार आहे. तर दुसरीकडे शिक्षक भरतीच्या ( Teacher Recruitment ) पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या  टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. शाळात विद्यार्थी किती असतात यावर नियंत्रण नसत, सर्व शाळेवर आता सीसी टिव्ही कॅमेरे (cctv cameras) लावले जातील. शिक्षक भरतीला स्टे लागला म्हणून कंत्राटी  शिक्षक घेतले आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

 

प्रफुल पटेल यांनी सांगितलं शरद पवारांच्या भेटीत काय घडलं ?

 

दरम्यान, राज्यात शिक्षक भरती गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. तर दुसरीकडे निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढत झाली आहे. त्यामुळे रिक्त शिक्षकांची संख्या वाढत आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांत सुरु आहे. मात्र, त्यावर अंमलबजावणी होत नाही. परंतु आता शालेय शिक्षण मंत्र्यांनी शिक्षक भरतीची घोषणा केल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.

Local ad 1