NCP Ministers Meet Sharad pawar : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट ! राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला

NCP Ministers Meet Sharad pawar मुंबई : गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणात कधी काय होईल, याचा अंदाज बांधणे भल्या भल्यांना शक्य होत नाही. पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये थेट सहभागी होत मंत्री पदाची शपथ घेतली होती. रविवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) मोठी राजकीय घडामोड होत असल्याचे समोर आले.

 

राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या भेटीला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेले आहेत. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

 

NCP Ministers Meet Sharad pawar

 

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ (Deputy Chief Minister Ajit Pawar, NCP Leader Praful Patel, MP Sunil Tatkare, NCP Ministers Chhagan Bhujbal, Dilip Valse Patil, Hasan Mushrif, Aditi Tatkare, Dhananjay Munde, Anil Patil Dharmarao Baba Patil, Sanjay Bansode, Narhari Jirwal) यांच्यासह सर्वच मोठे नेते शरद पवार यांना भेटायला गेले आहेत.

 

शरद पवार हे मंत्रालयासमोरीलच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहेत. तिथेच हे मंत्री पवारांना भेटायला गेले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच  मंत्री शरद पवार यांची भेट घेत आहेत. हे.

Local ad 1