पुण्याच्या नद्यांना विष देणाऱ्यांना ब्रेक ! ७४ MLD सांडपाणी आता होणार शुद्ध
मुंढवा, वारजे, वडगाव येथील ७४ एमएलडी क्षमतेची केंद्रे अंतिम टप्प्यात; एकूण प्रकल्प खर्च ११७३ कोटी
पुणे | प्रतिनिधी
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या PARMM (Pollution Abatement of River Mula-Mutha) प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या ११ सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांपैकी मुंढवा (२० एमएलडी), वारजे (२८ एमएलडी) आणि वडगाव (२६ एमएलडी) या केंद्रांची ड्राय रन टेस्ट पूर्ण झाली असून लवकरच वेट टेस्ट घेण्यात येणार आहे. या तिन्ही केंद्रांची एकत्रित क्षमता ७४ एमएलडी आहे. (parmm project pune stp mula mutha river)
‘बघ्यां’च्या गर्दीतून पुढे येत मयूरने जे केले, ते प्रत्येकाने शिकण्यासारखे
हा प्रकल्प केंद्र शासनाचे राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, JICA (जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. ठेकेदार म्हणून Enviro Control & Toshiba Water Solutions JV कार्यरत आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च २०२२ रोजी झाले होते.
काय काम सुरू आहे?
पुण्यातील विविध भागांतून नदीत मिसळणारे सांडपाणी अडवण्यासाठी:
* ११ नवीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे (STP)
* मुख्य मलवाहिन्यांचे Missing Links काम
* CPCB मानकांनुसार शुद्धीकरण
कोणत्या भागातील सांडपाणी कुठे जाणार?
केंद्र – क्षमता – सेवा क्षेत्र
मुंढवा : 20 MLD – हांडेवाडी, मोहम्मद वाडी, मगरपट्टा, ससाणे नगर, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट .
वारजे – 28 MLD – वारजे, रामनगर परिसर |
वडगाव – 26 MLD – धायरी, जांभुळवाडी, आंबेगाव, रायकर मळा
पुढील टप्पे असे असतील
हडपसर मत्स्यबीज केंद्र (७ एमएलडी) व खराडी (३० एमएलडी) — ट्रायल टेस्ट २ महिन्यांत. तर उर्वरित ५ केंद्रे २०२६ अखेर पूर्ण होतील.
प्रकल्पाची आर्थिक रूपरेषा (कोटी ₹)
मंजूर प्रकल्प – 990.26
केंद्र शासन हिस्सा (85%) – 841.72
पुणे मनपा हिस्सा (15%) – 148.54
आतापर्यंत खर्च – 844.45
O&M (15 वर्षे) – 300.21
क्षमता किती वाढणार?
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहराची एकूण सांडपाणी प्रक्रिया क्षमता:
४७७ MLD (अस्तित्वातील) + ३९६ MLD (PARMM) + २२ MLD = ८९५ MLD
❓ प्रश्न–उत्तर
प्र. PARMM प्रकल्प म्हणजे काय?
उ. मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे उभारण्याचा प्रकल्प.
प्र. किती STP उभारली जात आहेत?
उ. एकूण ११ नवीन सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे.
प्र. सध्या कोणती केंद्रे तयार आहेत?
उ. मुंढवा, वारजे आणि वडगाव — एकूण ७४ MLD क्षमता.
प्र. प्रकल्प पूर्ण झाल्यावर काय फायदा?
उ. नदीत जाणारे असंशोधित सांडपाणी थांबेल व पर्यावरण सुधारेल.
प्र. प्रकल्पासाठी निधी कोण देत आहे?
उ. केंद्र शासन (८५%) व पुणे मनपा (१५%), तसेच JICA सहकार्य.

