काटकळंबा वासियांना मिळणार प्रत्येक घरात शुद्ध पाणी

कंधार : गेल्या पंचवीस वर्षापासून काटकळंबा गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, आता काटकळंबा येथील प्रत्येक कुटुंबांना प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत  (Jal Jeevan Mission) काटकळंबा येथे घर जल योजनेचे भूमिपूजन नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर (Nanded MP Pratap Patil Chikhlikar) यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. (Katkalamba residents will get clean water in every house)

 

 

यावेळी सरपंच श्रीमती पंचफुलाबाई वाकोरे (Sarpanch Mrs. Panchfulabai Wakore), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखाताई काळुंखे (Zilla Parishad Deputy Chief Executive Officer Rekhatai Kalunkhe), गटविकास अधिकारी महेश पाटील (Group Development Officer Mahesh Patil), भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर (BJP District General Secretary Praveen Patil Chikhlikar), पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील (Amol Patil, Executive Engineer, Water Supply Department), बाबुराव केंद्रे, शंकरराव नाईक, भगवान राठोड, माजी सरपंच सचिन पाटील चिखलीकर, माजी उपनगराध्यक्ष  जफरुद्दीन बाहोद्दीन, ग्रामविकास अधिकारी जीपी मुंडकर, शिवाजी पाटील वाकोरे, अशोक चावरे, माधव वाकोरे, वजीर पठाण, लक्ष्मण विभुते, उज्वला कुठारे, सुकेशना कोळीगीरे, रंजना कांबळे, पद्मिनी कांबळे, शैलजा चावरे आदी उपस्थित होते.

 

 

कुलदैवत रेणुका देवी या मंदिराचा जीर्णोद्धार तसेच ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत व गावातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग बिदर या दोन्ही बाजुने नाली बांधकाम तसेच या रस्त्यावर लोखंडी पूल या मागणी ग्रामपंचायत कार्यालयाने केली आहे. या समस्याची आश्वासने लवकरच सोडण्यात येईल निधीची कमतरता कमी पडणार नाही, असे आश्वासन खासदार चिखलीकर यांनी दिले.

 

दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी पाटील वाकोरे यांनी केले. त्यात गावातील रखडलेली विकास कामे कामांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली त्यावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.

Local ad 1