...

‘बघ्यां’च्या गर्दीतून पुढे येत मयूरने जे केले, ते प्रत्येकाने शिकण्यासारखे

 

 

पुणे, दि. २५ : रस्त्यावर अपघात किंवा आपत्कालीन प्रसंग घडला की अनेकदा लोक फक्त बघ्यांची भूमिका घेतात. मात्र सिंहगड रस्ता परिसरातील समर्थनगर येथील मयूर निवंगुणे या युवकाने माणुसकीचा जिवंत नमुना दाखवत फिट (अपस्माराचा झटका) आलेल्या दुचाकीस्वाराचे प्राण वाचवण्यासारखी मदत केली. (mayur nivangune helped epileptic patient on road pune)

 

समाजसेवेचा आदर्श : रोहन सुरवसे पाटील : वाढदिवस विशेष !

 

शुक्रवारी (ता. २३) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास मयूर नवले पुलाजवळून कामानिमित्त जात असताना वडगाव कडून नवले पुलाकडे जाणाऱ्या एका ३०–३२ वर्षीय दुचाकीस्वाराला अचानक फिट आली. तो रस्त्यावर कोसळला. त्याच्या तोंडाला दुखापत झाली होती आणि तो पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत होता. त्याच्या भोवती लोकांची गर्दी जमली होती; मात्र प्रत्यक्ष मदतीला कोणी पुढे येत नव्हते.

 

ही परिस्थिती पाहताच मयूरने क्षणाचाही विलंब न करता गर्दीतून पुढे येत त्या व्यक्तीला उचलून रस्त्याच्या सुरक्षित कडेला बसवले. त्यानंतर त्याच्या मोबाईलमधून कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. एवढ्यावर न थांबता मयूरने त्या व्यक्तीला स्वामीनारायण मंदिर परिसरातील त्याच्या घरी सुरक्षित पोहोचवले.

 

या संपूर्ण प्रकारात मयूरचा जवळपास एक तास गेला; मात्र त्याने कोणतीही तक्रार न करता मानवतेचा आदर्श ठेवला. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्याचे मनापासून आभार मानले असून, परिसरातही त्याच्या या धाडसाचे आणि संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.“रस्त्यावर कोणाला मदतीची गरज भासली, तर नक्की मदत करा,” असे आवाहन मयूरने नागरिकांना केले आहे. धावपळीच्या जीवनात कमी होत चाललेल्या माणुसकीची ही घटना आशेचा किरण ठरत आहे.

 

 

 

Local ad 1