MH Times Exclusive News । नांदेड-पुणे एक्सप्रेस रेल्वेला क्रासिंगसाठी जागो-जागी रेड सिग्नल

MH Times Exclusive News । नांदेड : मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हयास हिंगोली आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील प्रवाश्यांना पुणे येथे जाण्यासाठी नांदेड-पुणे एक्सप्रेस (Nanded-Pune express train) रेल्वे क्रामांक 17630 रेल्वे महत्वाची आहे. परंतु या रेल्वेने प्रवास नकोसा झाला आहे. मात्र, प्रवाश्यांचा नाविलाज असून, नांदेड ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत (Nanded, Chhatrapati Sambhajinagar) ही रेल्वे जागो-जागी क्रासिंगसाठी थांबवली जाते. (Nanded-Pune express train becomes passenger; Red signals at places for railway crossings)

 

नांदेड येथून 18 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता रेल्वे वेळेवर निघाली. ती पुर्णा पर्यंत वेगाने आली. मात्र, स्टेशनवर पोहोचली तेथून पुढे जाण्यासाठी तिला ग्रिन सिंग्नल मिळत नव्हते. या दरम्यान, नांदेडच्या दिशेने दोन आणि पुर्णा येथून परळीकडे जाणारी एक आणि एक मालवाहतूक रेल्वे पास झाली. मात्र, या एक्सप्रेसला हिरवा कंदील मिळालाच नाही.

 

Nanded-Pune express train becomes passenger; Red signals at places for railway crossings
तक्रार केल्यानंतर आलेला मॅसेज

 

पुर्णा स्टेशनवरुन रेल्वे एकदाची निघाली. परंतु परभणी पासून काही अंतरावर असलेल्या पिंगळी तेथे समोरून येणाऱ्या रेल्वेसाठी पुन्हा थांबविण्यात आली. तेथून निघून परभणी स्टेशनवर पोहोचली. मात्र, त्याठिकाणी तर कहरच झाला. तिथे तब्बल 45 मिनिट रेल्वेला रेड सिग्नल दाखवण्यात आला. त्यामुळे रेल्वे जाग्यावरच थांबलेली होती. जालनाच्या जवळ पुन्हा एकदा क्रॉसिंगसाठी थांबविण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचण्याची 8: 22 मिनटे ही वेळ होती. रेल्वेला पोहोचायला 9 : 50 मिनिटे लागली. त्यातच जनरल तिकीट घेऊन आरक्षित कोचमध्ये प्रवासी बिनधास्त येऊन बसतता. तिकीट चेकर येतो, परंतु पावती करावी लागेल, असे सांगून 50 ते 100 रुपये घेऊन निघून जातो. त्यामुळे ज्या प्रवाश्यांनी आरक्षित कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतो.

 

पाणी नसल्याची तक्रार…

नांदेड – पुणे एक्सप्रेस (रेल्वे क्रामांक 17630) ही रेल्वे नांदेड येथून सुटत असते. त्यामुळे रेल्वेची स्वच्छता करणे आणि पाणी भरणे आवश्यक असते. मात्र, 18 डिसेंबर रोजी निघालेल्या रेल्वेच्या एस – 4 या कोचमधील स्वच्छतागृहात पाणी नव्हते. त्यावेळी तिकट चेकरला विचारलं असता, त्याने तक्रार करण्यात आली असून, पुढील येणाऱ्या स्टेशनवर भरले जाईल, असे पुर्णा येथे सांगितले. परभणी आणि मानवत रोड स्टेशनवर पाणी भरण्यात आले नाही. रात्री 8 वाजून 20 वाजता एक जण असन क्रमांक शोधत आला. तो म्हणाला तक्रार कोणी केली, काय समस्या आहे. (लेखी तक्रारीत सर्व व्यवस्थित लिहण्यात आले होते.) स्वच्छता गृहात पाणी नाही, संपूर्ण घाण झाली आहे, तो पाहणी करुन मोटार खराब झाली असून, दुरूस्त करणाऱ्याला कळविण्यात आले आहे, तो येत आहे, असे सांगुन तो निघून गेला. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता पुन्हा तिघेजण स्वच्छता करण्यासाठी आले. मात्र, त्यांनी पाणी आल्याशिवय स्वच्छता करता येणार नसल्याचे सांगुन निघून गेले. दुसरीकडे तक्रार सहा वाजून 11 मिनिटांनी केली होती. त्यावर तुमची तक्रार नोंदविण्यात आली आहे. लवकरच तुमची समस्या सोडवली जाईल, असा उत्तर आले. त्यानंतर रात्री आठ वाजून 3 मिनिटांनी तुमची समस्या सोडविण्यात आली आहे. त्यावर तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा, असा मॅसेज आला. मात्र, वास्तवात समस्या सुटलेलीच नव्हती.

 

रिक्षा चालकांकडून होते लूट

नांदेड येथून दुपारी साडेतीन वाजता निघालेली पुणे एक्सप्रेस ही रेल्वे पुण्यात दुसऱ्या दिवसी पाहटे पाच वाजण्याच्या सुमारास पोहोचते. पहाटेच्या वेळी पीएमपीएमएलची सेवा सकाळी सहा वाजता सुरु होते. त्यामुळे रेल्वेने आलेल्या प्रवाशांना कॅब किंवा रिक्षाशिवाय पर्याय नसतो. रिक्षा चालकांकडून मनमानीपणे पैश्यांची मागणी लूट केली जाते.

दररोज जे-जा करणाऱ्यांचा सर्वाधिक त्रास

पुण्याकडून नांदेडकडे जातानाही छत्रपती संभाजीनगरपासून कार्यालयीन किंवा इतर कामानिमित्त दररोज ये-जा करणारे प्रवासी थेटपणे आरक्षित कोचमधून प्रवास करतात. जागा जिथे दिसेल तिथे बसतात. जालना, परभणी, पुर्णा येथूनही असे प्रवासी कोचमध्ये येऊन बसतात.

 

 

 

Local ad 1